एप्रिल महिना ठरतोय धोक्याचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:57+5:302021-04-22T04:39:57+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यासाठी एप्रिल महिना धोक्याचा ठरतोय. गत वीस दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्या दोन हजारांनी वाढली असून, अद्यापही संक्रमणाचा ...

April is a dangerous month! | एप्रिल महिना ठरतोय धोक्याचा !

एप्रिल महिना ठरतोय धोक्याचा !

Next

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यासाठी एप्रिल महिना धोक्याचा ठरतोय. गत वीस दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्या दोन हजारांनी वाढली असून, अद्यापही संक्रमणाचा वेग कायम आहे. त्यामुळे आणखी दहा दिवसांत शेकडो रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. रुग्णवाढ आणि संक्रमणाचा कहर पाहता, गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्याची पुनरावृत्ती चालू महिन्यात होत असल्याचे दिसते.

गतवर्षी एप्रिल महिन्यातच कोरोनाचा कऱ्हाड तालुक्यात शिरकाव झाला होता. सुरुवातीच्या महिन्यातच तालुक्यात ३३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर संक्रमणाचा वेग वाढला आणि केवळ ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या तीन हजारांवर जाऊन पोहोचली. त्यानंतरचा सप्टेंबर महिना सर्वाधिक संक्रमणाचा ठरला. चार हजारांवर रुग्ण गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात वाढले होते. ऑक्टोबर २०२० पासून जानेवारी २०२१ पर्यंत रुग्णसंख्या घटत गेली. कोरोना संक्रमण कमी झाल्यामुळे जनजीवनही पूर्वपदावर येत होते. मात्र, फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली, ती आजअखेर कामय आहे. गत चार महिन्यांत तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने रुग्णवाढ सुरू आहे. त्यातच एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

सद्य:स्थितीत तालुक्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा १ हजार ३०० पेक्षा जास्त आहे. आणखी काही दिवसांत तो वाढण्याची शक्यता असून रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करताना नातेवाइकांना कसरतच करावी लागत आहे. सध्या आरोग्य विभागाने ‘होम आयसोलेशन’वर भर दिला असला तरी गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून, भविष्यासाठी आत्ताच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- चौकट

कऱ्हाडात २१९, मलकापुरात १४८ रुग्ण

कऱ्हाडसह मलकापूर शहरात सध्या कोरोना रुग्णांची साखळी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाधिताच्या कुटुंबातील तसेच संपर्कातील अनेकजण पॉझिटिव्ह आढळत असून, या साखळ्या खंडित करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. आजअखेर कऱ्हाडातील रुग्णसंख्या ३ हजार ५९, तर मलकापुरातील १ हजार ५१२ असून सद्य:स्थितीत कऱ्हाडात संख्या २१९, तर मलकापुरात १४८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- चौकट

महिनानिहाय रुग्णवाढ

मार्च २०२० : ०

एप्रिल : ३३

मे : १४८

जून : १५९

जुलै : ५१९

ऑगस्ट : २९९७

सप्टेंबर : ४३९५

ऑक्टोबर : १००२

नोव्हेंबर : २९८

डिसेंबर : १७१

जानेवारी २०२१ : ८९

फेब्रुवारी : १३८

मार्च : ५९२

एप्रिल : २१६८ (दि. २० अखेर)

- चौकट

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी

होम आयसोलेशन : ९९२

रुग्णालयात दाखल : ३९७

- चौकट

उपचारात रुग्ण

कृष्णा हॉस्पिटल : १६८

सह्याद्री हॉस्पिटल : ६१

उपजिल्हा रुग्णालय : ३५

जिल्हा रुग्णालय : ५

पार्ले, सह्याद्री सेंटर : ७५

एरम हॉस्पिटल : २६

श्री हॉस्पिटल : १२

कऱ्हाड हॉस्पिटल : १५

- चौकट

कोरोना अपडेट

एकूण बाधित : १२७०९

कोरोनामुक्त : १०९५५

दुर्दैवी मृत्यू : ३६५

उपचारात : १३८९

Web Title: April is a dangerous month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.