ढेबेवाडी फाट्यावर वडापची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:45 AM2021-09-17T04:45:36+5:302021-09-17T04:45:36+5:30

कऱ्हाड : मलकापूर येथील ढेबेवाडी फाटा हे रहदारीचे ठिकाण असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानेही आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची संख्याही जास्त ...

Arbitrariness of Vadap on Dhebewadi fork | ढेबेवाडी फाट्यावर वडापची मनमानी

ढेबेवाडी फाट्यावर वडापची मनमानी

Next

कऱ्हाड : मलकापूर येथील ढेबेवाडी फाटा हे रहदारीचे ठिकाण असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानेही आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची संख्याही जास्त असते. मात्र, याचठिकाणी वडापची वाहने अस्ताव्यस्त पार्क केली जात असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वडाप चालकांची मनमानी वाढली आहे.

पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटल परिसरात उड्डाणपुलापासून ढेबेवाडी मार्गाला प्रारंभ होतो. ढेबेवाडीकडून येणारी, कृष्णा हॉस्पिटलकडून तसेच कऱ्हाड शहरातून येणारी व जाणारी अशी सर्व बाजूंची वाहने या फाट्यावर एकत्रित येतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहनांची गर्दी पाहायला मिळते. या फाट्यावर दक्षिण बाजूला दुकानांची रांग आहे. त्या दुकानांच्या समोरच परवानाधारक तसेच विनापरवानाधारक वडापच्या वाहनांची गर्दी कायम असते. खासगी चारचाकी तसेच दुचाकी वाहनेही मनमानीपणे या परिसरात पार्क केली जातात. त्यामुळे या परिसरात पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना कसरत करून दुकानांकडे जावे लागते. वडापच्या जीप, ऑटोरिक्षा प्रवासी भरायचे काम तिथेच करतात. त्याचठिकाणी एसटीची प्रतीक्षा करणारे प्रवासी थांबलेले असतात. त्यांची या वाहनांमुळे अडचण होते. रस्त्यावर वडापच्या गाड्या व पलीकडून रहदारी असे चित्र याठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. वाहतूक पोलिसांनी या परिसरात कारवाईचा बडगा उगारून वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहे.

Web Title: Arbitrariness of Vadap on Dhebewadi fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.