औंध ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणात मनमानी कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:24+5:302021-07-04T04:26:24+5:30

औंध : औंध येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाचा अनागोंदी व मनमानी कारभार त्वरित थांबवा, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य ...

Arbitrary management of vaccination in Aundh Rural Hospital! | औंध ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणात मनमानी कारभार!

औंध ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणात मनमानी कारभार!

Next

औंध : औंध येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाचा अनागोंदी व मनमानी कारभार त्वरित थांबवा, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करून दिला.

रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी शनिवारी येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवारी दुपारी ठिय्या आंदोलन

केले.

यावेळी या आंदोलनात अजित माळी, ओंकार माने, सुमित दंडवते, हेमंत हिंगे, जमीर मुलाणी, प्रशांत हुंबे व रयत क्रांती संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

यावेळी केलेल्या ठिय्या आंदोलनावेळी वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांना सागर जगदाळे व आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरत हा मनमानी कारभार त्वरित थांबवा, लसीकरण करताना रॅपिड टेस्ट घेऊनच लसीकरण करा, नियमाप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना लस द्या, टोकन पध्दत पारदर्शकपणे राबवा, नागरिक, रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावे, रुग्णांची व वयोवृद्ध नागरिकांची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी लावून धरली. त्याचबरोबर लसीकरण करणारा स्टाफच्या कारभाराची चौकशी करावी व वशिलेबाजी थांबवा, अशी जोरदार मागणी यावेळी जगदाळे यांनी केली.

याबाबत योग्य ती कारवाई वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाने न केल्यास पुढील आठवड्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.

०३औंध

औंध ग्रामीण रुग्णालयात क्रांती संघटनेचे सागर जगदाळे व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.(छाया-रशिद शेख)

Web Title: Arbitrary management of vaccination in Aundh Rural Hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.