‘कास’ला पुरातत्व खात्याची मंजुरी
By Admin | Published: March 27, 2015 12:27 AM2015-03-27T00:27:00+5:302015-03-27T00:27:00+5:30
सर्व अडथळे दूर : उंची वाढविण्याच्या कामास लवकरच सुरूवात होणार
सातारा : कास तलावाची उंची वाढविण्यासाठी वनविभागाने जागा हस्तांतरण करण्यास परवागी देताना भारतीय पुरातत्व खात्याची मान्यता घेण्याची अट घातली होती, त्यादृष्टीने दिल्ली येथून पुरातत्व खात्याची मान्यता मिळली आहे. त्यामुळे कास तलावाची उंची वाढविण्याचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे धरणाच्या कामास गती येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, कास तलावाची उंची वाढविल्याने ग्रॅव्हिटीने सातारकरांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, याचा विचार करून कास तलाव उंची वाढविण्याचा प्रस्ताव तयार झाला. कास धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला जागा हस्तांतरण करण्यास वन खाते तयार होत नव्हते. तसेच त्यासाठी काही जाचक अटी त्यांनी लादल्या होत्या. अटीची तसेच भारतीय पुरातत्व खात्याची मंजुरी मिळेल. परंतु वन खात्याने जागा हस्तांतरणास परवानगी जन हितासाठी दिल्याने वनविभागाने अटीशर्तीसह अखेर जागा हस्तांतरीत केली. त्यानुसार भारतीय पुरातत्व खात्याची मंजुरीहीची महत्त्वाची अट वनविभागाने घातली होती. पुरातत्व खात्याचे महासंचालक राकेश तिवारी, तसेच पुरातत्व खात्याचे सलग्न असणाऱ्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याबाबत सकारात्मक तोडगा काढला.
त्यानुसार भारतीय पुरातत्व खात्याच्या सक्षम प्राधिकरणाने कास तलाव उंची वाढविण्यासाठी विनाअट परवानगी देण्याबाबत मंजुरी दिली. (प्रतिनिधी)