भांडणे सोडविणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:25 AM2018-03-26T00:25:10+5:302018-03-26T00:25:10+5:30

Armed attack on the family who solved the quarrel | भांडणे सोडविणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

भांडणे सोडविणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

Next
ठळक मुद्देमलकापुरात तणाव : महिलांसह पाचजणांना मारहाण; एक जखमी

कºहाड : भांडणे सोडवायला गेलेल्या कुटुंबावर जमावाने सशस्त्र हल्ला केला. मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावर असलेल्या माळीनगरमध्ये शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांत सुमारे २५ जणांवर गुन्हा नोंद झला आहे.
याबाबत नासिर शमशाद खान (रा. बैलबाजार रोड, मलकापूर) यांनी कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून अमीर शेख, समीर मुजावर, वसीम शेख, अमीर ऊर्फ पेंटर मुल्ला, सिकंदर शेख, दाऊद शेख, मजहर पिरजादे, लाजम होडेकर (रा. गोटे, ता. कºहाड), अल्ताफ शेख व अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत तन्वीर बाबू जहागीरदार (रा. मुजावर कॉलनी, कºहाड) हा जखमी झाला आहे.
मलकापूर येथे राहणारे नासिर खान हे शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी असताना मित्र तन्वीर जहागीरदार हा त्यांच्याकडे आला. दाऊद शेख याच्यासह अन्य दोघांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तन्वीरने नासिर यांना सांगितले. नासिर यांच्यासह कुटुंबीय तन्वीरची समजूत घालत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या संशयितांच्या जमावाने तन्वीरला लोखंडी पाईप व दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या नासिर खान व त्याच्या घरातील भाऊ, भावजयी, आई यांनाही संशयितांनी मारहाण केली. तसेच त्यांनी नासिर खान यांच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. संशयितांनी केलेल्या मारहाणीत तन्वीर जहागीरदार गंभीर जखमी झाला असून, नासिर खान याच्यासह त्याचा भाऊ, भावजयी, आई यांना मुका मार लागला आहे. बैलबाजार रोड, गणपती मंदिराजवळ मारामारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस आल्याचे लक्षात येताच संशयितांनी दुचाकीवरून तेथून पोबारा केला. याप्रकरणी लाजम होडेकरसह सुमारे २५ जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झा लाआहे.

Web Title: Armed attack on the family who solved the quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.