पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महिला डॉक्टरांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:58+5:302021-08-01T04:35:58+5:30
दुर्गम भागात रुग्णसेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या ग्रुपने पूरस्थितीत अडकलेल्यांना आवश्यक वस्तूंसह आरोग्य सेवा पुरवली. दुर्गम भागात रुग्ण सेवा करणाऱ्या ...
दुर्गम भागात रुग्णसेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या ग्रुपने पूरस्थितीत अडकलेल्यांना आवश्यक वस्तूंसह आरोग्य सेवा पुरवली. दुर्गम भागात रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवर ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविताना त्यांना समाजातील विविध घटकांकडून मदतही मिळाली. आनंदिता वुमन फोरम आणि आयएमएच्या महिला विंगच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणलाही ही मदत पोहोचविण्यात आली. २०१८-२०१९ मध्ये महिला वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करण्याचं उद्दिष्ट ठेवून आनंदिता वुमन फोरम कार्यरत झाले. पूरग्रस्तांसाठी त्यांनी उभी केलेली मदत लाख मोलाची ठरली आहे.
पॉइंटर :
१५०० क्विंटल तांदूळ
३०० किलो डाळ
३०० किलो साखर
१५० किलो तेल
७२०० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या
७०० सॅनिटरी नॅपकिन
५०० किलो गव्हाचा आटा
१०० पाकीट मिरची पावडर
२०० जोडी अंर्तवस्त्र
१५० ब्लँकेट
४० चटई
१५० सतरंजी
५०० महिला डॉक्टर
३५० : महिला डॉक्टर
१५० : आयएमए वुमन विंग
वाहनचालक अन् पेट्रोलही विनामूल्य
पूरस्थितीचा फटका सातारा जिल्ह्यातील पाटणसह जावळी आणि वाई तालुक्यालाही बसला. त्यामुळे मदतीची गरज ज्या ज्या भागामध्ये आहे त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी आनंदिता ग्रुपला अडचण येत होती. अशातच महाबळेश्वर येथील रोहन मारे याने साहित्य पोहोचविण्याची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वत:ची गाडी घेऊन तो साहित्य पोहोचविण्यासाठी विविध ठिकाणी गेला. याबरोबरच पेट्रोलपंप चालक रमेश हलगेकर यांनीही मदत पोहोचविण्यासाठी निघालेल्या गाड्यांमध्ये विनामूल्य इंधन भरून या सेवेत आपलाही वाटा उचलला. हिरकणी फाउंडेशननेही विविध माध्यमांतून मदत मिळवून ती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली. सिदूरकवाडी येथील अमित मोरे यांनीही पाटण तालुक्यात मदत देण्यासाठी वाटा उचलला.
कोट :
वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या आनंदिता फोरम आणि आयएमए महिला विंग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मदत करण्यात आली. दुर्गम भागातील लोकांपर्यंत साहित्य पोहोचविण्यासाठी फोरमच्या प्रत्येक सदस्याने वाटा उचलला. त्याला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. संकटकाळात मदतीचा काही वाटा उचलता आला हे महत्त्वाचे.
- डॉ. दीपांजली पवार, आनंदिता लेडिज डॉक्टर फोरम, सातारा
सक्रिय सदस्या
डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. राजश्री देशपांडे, डॉ. दीपांजली पवार, डॉ. कल्याणी महाडिक, डॉ. अस्मिता घोरपडे, डॉ. वंदना घोरपडे, डॉ. स्नेहांजली सुतार, डॉ. नूतन फिरोदिया, डॉ. आशा बर्गे, डॉ. मीनल गावडे, डॉ. मंजूषा पवार, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. अर्चना लाहोटी.