लष्कराकडे ‘त्या’ बॉम्बचे रेकॉर्डच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:46+5:302021-05-31T04:27:46+5:30

तांबवे येथील कोयना नदीच्या पुलाखाली मासेमारी करणाऱ्या तीन युवकांना जिवंत हातबॉम्ब आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस आणि ...

The army has no record of 'those' bombs! | लष्कराकडे ‘त्या’ बॉम्बचे रेकॉर्डच नाही!

लष्कराकडे ‘त्या’ बॉम्बचे रेकॉर्डच नाही!

Next

तांबवे येथील कोयना नदीच्या पुलाखाली मासेमारी करणाऱ्या तीन युवकांना जिवंत हातबॉम्ब आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. हे बॉम्ब लष्करी फॅक्टरी बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. तालुका पोलिसांनी लष्कराच्या दारूगोळा निर्मिती कारखान्याशी संपर्क साधून या हातबॉम्बसंदर्भात विचारणा केली. त्यामध्ये हातबॉम्बनिर्मितीच्या बॅच नंबरनुसार ते १९६१ साली तयार झाल्याची माहिती समोर आली होती. लष्कराकडून संबंधित हातबॉम्ब कोणाला आणि कशासाठी वितरित केले आहेत, याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले होते. त्याचबरोबर ज्या प्लास्टिकच्या पिशवीत हातबॉम्ब सापडले त्या पिशवीवरील दुकानाच्या नावावरून एटीएस आणि पोलिसांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये जाऊन संबंधित कपड्याच्या दुकानाचा शोध घेतला. मात्र, तेथूनही ठोस माहिती मिळाली नाही.

- चौकट

हवालदार दर्जाच्या जवानाला वितरण

दरम्यान, हातबॉम्ब कोणाला, कधी व कशासाठी वितरित केले याची माहिती पोलिसांनी लष्कराकडे मागितली असता त्याचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. संबंधित हातबॉम्ब १९६७-६८ मध्ये लष्कराच्या रेकॉर्डवरून कमी झाले आहेत. ते ज्यांना वापरायला दिले जातात, ते हवालदार दर्जाचे जवान असतात. मात्र, ते कोणाला आणि कधी दिले, याची माहितीच नसल्याचे लष्कराने पोलिसांना लेखी दिले आहे.

Web Title: The army has no record of 'those' bombs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.