Satara Crime: विवाह लावून दिले अन् दोघांना सव्वाचार लाखाला फसवले; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:47 PM2023-06-12T12:47:28+5:302023-06-12T12:47:53+5:30

मुलगी पसंत असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी केला विवाह

Arranged marriage and cheated both of them for four lakhs, Incident in Karad Satara | Satara Crime: विवाह लावून दिले अन् दोघांना सव्वाचार लाखाला फसवले; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा

Satara Crime: विवाह लावून दिले अन् दोघांना सव्वाचार लाखाला फसवले; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा

googlenewsNext

कऱ्हाड : विवाहासाठी दोन तरुणांकडून सव्वाचार लाख रुपये घेतल्यानंतर बोगस विवाह लावून देऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश तानाजी नांगरे (रा. शेखरवाडी, ता. वाळवा) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.

वर्षा जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर, जि. सांगली), शंकर थोरात (रा. वसंतगड, ता. कऱ्हाड), पूजा ऊर्फ स्नेहल पाटील व पूजा यादव (दोघीही रा. इचलकरंजी - जवाहरनगर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, वसंतगड येथील शंकर थोरात हा विवाह ठरवतो, अशी माहिती शेखरवाडीतील रमेश नांगरे याला मिळाली . त्यानुसार शेखर व त्याच्या चुलत्यांनी वसंतगडमध्ये शंकर थोरात व वर्षा जाधव यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नांगरे याच्याकडून २ लाख २५ हजार रुपये घेतले. १५ एप्रिल रोजी पूजा पाटील या मुलीला दाखविले. मुलगी पसंत असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉलमध्ये त्या दोघांचा विवाह लावून दिला.

विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती. आठव्या दिवशी पूजेसाठी पूजा हिची आई, मावशी, मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा शेखरवाडीला येऊन पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो, असे सांगून पूजाला घेऊन गेले.

दरम्यान, दोनच दिवसांनी विश्रामबाग-सांगली पोलिस ठाण्यात वर्षा जाधव, शंकर थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती रमेश नांगरे याला मिळाली. त्यामुळे संशय आल्याने त्याने पूजा यादव हिच्या मोबाइलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी पाठवणार, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पत्नी पूजा सासरी न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे रमेश नांगरे याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

येणकेतील युवकाचीही फसवणूक

येणके येथील तरुणाचीही या टोळीने फसवणूक केली आहे. टोळीने दोन लाख रुपये घेऊन १५ डिसेंबर २०२२ रोजी येणकेतील तरुणाचा साक्षी साळुंखे या युवतीशी विवाह लावून दिला. विवाहानंतर २५ ते ३० दिवस साक्षी येणके येथे राहिली. मात्र, आजारी बहिणीला इंदापूर येथून भेटून येते, असे सांगून साक्षी गेली, ती परत आलीच नाही. त्यामुळे युवकाचीही दोन लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Arranged marriage and cheated both of them for four lakhs, Incident in Karad Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.