राजाळेत ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:14+5:302021-04-14T04:36:14+5:30

फलटण : राजाळे, ता. फलटण येथील ज्वेलर्सचे शटर तोडून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघेही जळगाव जिल्ह्यातील ...

Arrest of burglars at Rajale Jewelers | राजाळेत ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्यांना अटक

राजाळेत ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्यांना अटक

Next

फलटण : राजाळे, ता. फलटण येथील ज्वेलर्सचे शटर तोडून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघेही जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आहेत. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मुकेश नारसिंग बारेला (रा. नारद) व रवीन पारसिंग आर्य (रा. सुंदरनगर, जि. जळगाव) यांना अटक केली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राजाळे येथील नामजोशी कॉम्प्लेक्समधील गाळ्यातील राहुल ज्वेलर्स बारामतीकर या दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून दोघांनी आत प्रवेश केला. तसेच मुकेश बारेला व रवीन आर्य यांनी काउंटरच्या गल्ल्यामधून ७०० रुपयांची चोरी केली. हे पैसे चोरून पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले.

या घटनेची फिर्याद दुकान मालक पद्माकर होनमाणे (रा. राजाळे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. हवालदार धराडे हे तपास करीत आहेत.

..................................................

Web Title: Arrest of burglars at Rajale Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.