उदयनराजेंना अटक करा

By admin | Published: April 25, 2017 10:45 PM2017-04-25T22:45:02+5:302017-04-25T22:45:02+5:30

संदीप मोझर : सर्वसामान्यांना जो न्याय तोच ‘राजा’ला का नाही ?

Arrest Udayan Rajen | उदयनराजेंना अटक करा

उदयनराजेंना अटक करा

Next



सातारा : ‘लोकशाहीमध्ये सर्वजण एक समान असतात. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. असे असतानाही खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांतील आरोपाबद्दल अटकपूर्व जामीन फेटाळून सुद्धा गेल्या १५ दिवसांपासून खासदार उदयनराजेंना अटक करण्यात का टाळाटाळ होते? सर्वसामान्यांना जो न्याय तोच राजाला का नाही?, असा प्रश्न उपस्थित करून याप्रकरणी उदयनराजे भोसले यांच्या अटकेसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करणार आहे,’ असे ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी म्हटले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून दरमहा सुमारे ६० ते ७० लाखांची खंडणी गोळा करणाऱ्या आणि अकलूजहून साताऱ्यात जगण्यासाठी आलेल्या अशोक सावंतला कोठडी मिळाल्यावरही सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. जर तो खरेच आजारी असेल तर त्याला सिव्हिलमधील आरोपी वॉर्डमध्ये ठेवावे. त्याला असा कोणता आजार झाला आहे की, त्याची खास बडदास्त ठेवली जात आहे. माझ्या मते, सावंतला राजकीय रोग झाला असावा. सदरहू आरोपी कोणता पराक्रम करून आला आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याची खातीरदारी केली जात आहे. याचाही खुलासा व्हायला हवा. कारागृहामध्ये कित्येक गोरगरीब आरोपी वैद्यकीय उपचाराअभावी खितपत पडतात आणि सिव्हिलमध्ये जाण्यासाठी अक्षरश: नवसही बोलतात. मग अटक झाल्यापासून अशोक सावंतला हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी व्यवस्थेत का आणि कशासाठी ठेवले जात आहे, याचीही चौकशी व्हावी.
लोकशाहीत जनताच राजा असते. कोणी राजा, कोणी प्रजा अशी कोणतीच स्वतंत्र कॅटेगरी नसते. मग लोकसभेचे सदस्यत्व भूषविणाऱ्या उदयनराजेंना कोणाच्या दबावापोटी अटक होत नाही?
सर्वसामान्य व्यक्तीकडून किरकोळ गुन्हा घडला. थोडीफार चूक झाली तरी त्याच्यावर तत्काळ कारवाई होते. खंडणी व खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे स्पष्ट होऊनही उदयनराजेंना अटक करण्यात टाळाटाळ होत आहे. सर्वसामान्यांना जो न्याय तोच ‘राजा’ला का नाही? हा प्रश्न जिल्ह्यासहीत महाराष्ट्रातील सामान्य जनतेला पडला आहे.’
यावेळी खेडच्या उपसरपंच सुशीला मोझर, मनसे कामगार सेना जिल्हा सचिव सचिन पवार, सागर पवार, प्रगतशील शेतकरी दिलीप सुर्वे, मधुकर जाधव, आसरेचे उपसरपंच अनिल सणस, कुमार जाधव, नितीन सुतार, महिला आघाडीच्या मनीषा चव्हाण, स्वाती माने, अनिता जाधव, भारती गावडे, दीपाली कुंभार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अटकेच्या भीतीने दूर पळत आहेत...
‘राजकीय प्रवाहातील अनेकांवर यापूर्वी पोलिस व न्यायालयात जाण्याचे प्रसंग आले. मात्र, त्या प्रत्येकाने तपास यंत्रणेला सहकार्य करून आणि न्याय देवतेचा आदर करून भारतीय संविधानाचा मान राखला आहे. मात्र, स्वत:स डॅशिंग म्हणविणारे खासदार मात्र अटकेच्या भीतीने कारवाईपासून दूर पळत आहेत. खंडणी व खुनी हल्ल्यातील त्यांच्या सहभागाचे पुरावे समोर येऊनही स्वत:च्या बचावासाठी ते वेळकाढूपणा करीत आहेत. त्यांनी जे आजपर्यंत पेरले तेच आता उगवत आहे. तरी येत्या आठ दिवसांत उदयनराजेंना अटक न झाल्यास या प्रकरणात व्यापक जनआंदोलन उभारणार आहे,’ असेही संदीप मोझर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Arrest Udayan Rajen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.