कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:41+5:302021-02-10T04:39:41+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगळवार पेठेत भेळगाडा चालविणाऱ्या मिलिंद शिंदे याचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पांडुरंगला होता. ...

Arrested for attacking with a scythe | कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोरास अटक

कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोरास अटक

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगळवार पेठेत भेळगाडा चालविणाऱ्या मिलिंद शिंदे याचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पांडुरंगला होता. या संशयावरून ६ फेब्रुवारी रोजी पांडुरंगने संबंधित महिलेलाही मारहाण केली होती. सोमवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ येथील पांढरीचा मारूती मंदिराजवळ मिलिंद शिंदे हा भेळगाड्यावर नेहमीप्रमाणे व्यवसाय करत होता. त्यावेळी पांडुरंग नाईक याने त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतःच्या चेहऱ्यास व अंगावर काळा रंग लावून मिलिंद शिंदे यांच्या मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आणि तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून पांडुरंग नाईक याला काही तासात अटक केली. उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक असिफ जमादार, संजय जाधव, सचिन साळुंखे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Arrested for attacking with a scythe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.