महिलांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटणाऱ्यास अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:28+5:302021-07-04T04:26:28+5:30

औंध : औंध येथील तीन महिलांना दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने लुटून पळून जाणाऱ्या एकास घटना ...

Arrested for robbing women with ax! | महिलांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटणाऱ्यास अटक!

महिलांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटणाऱ्यास अटक!

googlenewsNext

औंध : औंध येथील तीन महिलांना दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने लुटून पळून जाणाऱ्या एकास घटना घडल्यानंतर एका तासाच्या आत औंध पोलिसांनी अटक केली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी औंधनजीक घडलेल्या लूटमारीच्या घटनेमुळे औंध परिसरात महिलावर्गात खळबळ उडाली आहे.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील प्राथमिक शिक्षिका प्राजक्ता प्रमोद गुजर, त्यांच्या आई हेमलता, जाऊ प्रणोती गुजर या शुक्रवारी सायंकाळी औंध ते वरुड रस्त्यावर फिरायला गेल्या होत्या. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्या औंध गावच्या दक्षिणेकडील पिराच्या मशिदीजवळ फिरून परत आल्यानंतर पाठीमागून एक दुचाकीस्वार आला व अंधाराचा फायदा घेऊन कुऱ्हाडीचा धाक दाखवत प्राजक्ता गुजर यांना कानफटीत मारून तुमच्याजवळ असणारे दागिने द्या, अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकीन, असा दम प्राजक्ता गुजर, त्यांची आई हेमलता यांना दिला. त्यानंतर दोघींनीही घाबरून जाऊन गळ्यातील मंगळसूत्र, जोंधळी सोन्याची माळ, हातातील अंगठी काढून दिली. हा सर्व ऐवज सुमारे एक लाख बत्तीस हजारांचा होता. त्यानंतर या लूटमारीची माहिती औंध गावात पोलीस स्टेशनला समजताच सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत गावातील सीसीटीव्ही तपासणी करून संशयित रवींद्र विठ्ठल जामकर (वय ३४) यास महिलांनी सांगितलेल्या वर्णनावरून ताब्यात घेत त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ असणारे सोन्याचे दागिने, अंगठी, कुऱ्हाड जप्त केली व त्यास अटक केली. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे औंध परिसर हादरून गेला होता. दरम्यान, याप्रकरणी रवींद्र जामकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, किरण जाधव, कुंडलिक कटरे, पंकज भुजबळ, वाघ, यादव अधिक तपास करीत आहेत. आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फोटो:

०३औंध

औंध पोलिसांनी एका तासाच्या आत आरोपीला मुद्देमालासह अटक केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.(छाया : रशिद शेख)

Web Title: Arrested for robbing women with ax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.