एमआयडीसीतील कामगाराला लुटणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 07:07 PM2019-12-27T19:07:00+5:302019-12-27T19:11:00+5:30
खानापूर हद्दीत धोम डावा कालव्याच्या पश्चिम बाजूकडील रस्त्यावर खानापूर व शेंदुरजणे हद्दीतील खाणीचा माळ येथे आले. त्यावेळी याने मोटरसायकल थांबविली. हात धरला व जाधव यांच्या खिशातील मोबाईल व पाकिटातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले होते.
वाई : येथील खानापूर औद्योगिक वसाहतीतील काम आटोपून घरी परतत असताना कामगाराला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गाडीवर बसवून शेंदूरजणे हद्दीतील खाणीचा माळ येथे नेऊन त्याठिकाणी मोबाईलसह साडेआठ हजार रुपये सोमवार, दि. २३ रोजी लुटले होते. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर संशयावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्'ाची कबुली दिली.
याबाबत माहिती अशी की, खानापूर येथील सोनल ज्ञानेश्वर जाधव (वय २८) हा सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एमआयडीसी कंपनीमधून कामावरून घरी जाण्यासाठी एमआयडीसी येथील मंगल कार्यालयासमोर उभा असताना दोन व्यक्ती तेथे दुचाकीवरून आले. ‘कोठे जाणार आहे,’ असे विचारून ‘आम्ही तुला सोडतो,’ असे म्हणून गाडीवर बसवले. खानापूर हद्दीत धोम डावा कालव्याच्या पश्चिम बाजूकडील रस्त्यावर खानापूर व शेंदुरजणे हद्दीतील खाणीचा माळ येथे आले. त्यावेळी याने मोटरसायकल थांबविली. हात धरला व जाधव यांच्या खिशातील मोबाईल व पाकिटातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले होते.
याबाबत गुन्हा दखल झाल्यानंतर माहितीच्या आधारे दीपक हरी यादव (रा. मुंगसेआळी, रविवारपेठ वाई) व गणेश अनिल गायकवाड (रा. शेंदुरजणे, ता. वाई) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपासणी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एका दुचाकीसह ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक फौजदार कृष्णा पवार, पोलीस नाईक जितेंद्र शिंदे, पोलीस नाईक प्रशांत शिंदे, भाऊ धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार गरुड, हनुमंत दडस, सोमनाथ बल्लाळ, कांताराम बोºहाडे, सतीश कदम यांनी सहभाग घेतला.