मरावे परि नेत्ररुपी उरावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:28 PM2017-10-05T16:28:53+5:302017-10-05T16:28:58+5:30
कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिरमधील आदर्श शिक्षिका विद्या शरद शेटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ‘मरावे परि किर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले नेत्रदान करून आदर्श शिक्षिकेचे आदर्श कर्तव्यही पार पाडले आहे.
मायणी , 5 : कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिरमधील आदर्श शिक्षिका विद्या शरद शेटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ‘मरावे परि किर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले नेत्रदान करून आदर्श शिक्षिकेचे आदर्श कर्तव्यही पार पाडले आहे.
शिक्षिका विद्या शेटे या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होत्या. प्रभावी व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट वक्तृत्व या जोरावर त्यांनी समाजामध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. उपक्रमशील आदर्श शिक्षिका म्हणून त्यांची ओळख असल्याने सर्व विद्यार्थ्यांत त्यांची लोकप्रियता होती.
शेटे यांचे पती शरद शेटे हे मायणी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून, त्यांचा मुलगा विरेंद्र हा दहावीच्या वर्गात शिकत आहे. सर्व काही सुरळीत चालले असतानाच प्रकृती खालावल्याने विद्या शेटे यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने शेटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
अशा परिस्थितीतही सामाजिक कर्तव्यातून शेटे यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आणि समाजापुढेही एक आदर्शच ठेवला. कलेढोणमधील अवयवदान करणाºया विद्या शेटे या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.