सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:50 AM2022-08-31T11:50:06+5:302022-08-31T11:53:37+5:30

बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार

Arson of boat club office in Bamanoli, case registered against unknown person | सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Next

अक्षय गोरे

बामणोली: महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या कार्यालयाची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना आज, बुधवारी सकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञाताने कार्यालयातील साहित्याची देखील जाळपोळ केली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात कार्यालयातील सर्व रजिस्टर जळून खाक झाले असून इतर साहित्य देखील जाळले आहे. तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत बोट चालकांनी या घटनेबाबत अज्ञाताविरोधात मेढा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

बोट चालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता..

गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या विश्रांतीनंतर नुकताच बोट क्लब सुरू झाला होता. यातच अशी घटना घडल्यामुळे; बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे बोट चालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Web Title: Arson of boat club office in Bamanoli, case registered against unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.