धावडशी यात्रेत मनोरंजनातून अंधश्रध्दा निर्मूलन

By admin | Published: April 15, 2017 12:23 PM2017-04-15T12:23:50+5:302017-04-15T12:23:50+5:30

अनोखा पायंडा: जादूटोणाविरोधी कायद्याचा लक्षवेधी चित्ररथ

Artificial eradication from a recreational journey | धावडशी यात्रेत मनोरंजनातून अंधश्रध्दा निर्मूलन

धावडशी यात्रेत मनोरंजनातून अंधश्रध्दा निर्मूलन

Next

आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. १५ : जिल्ह्यातील धावडशी हे अत्यंत महत्त्वाचे गाव. दरवर्षी वाघजाई देवीच्या यात्रेत प्रथेप्रमाणे देवीची पालखी अत्यंत दिमाखदार अशा मिरवणुकीने संपूर्ण गावात रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत वाजत-गाजत फिरवली जाते. यामध्ये अनेक सोंगे विविध ट्रॉली ट्रॅक्टरवर सजवली जातात. यावर्षी याला अत्यंत आगळे-वेगळे व सकारात्मक प्रबोधनाचे रूप देण्याचे गावातील नवजवान मित्र मंडळ, नेहरू युवा मंडळ व सिद्धिविनायक ग्रुप या तिन्ही तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी ठरवले.


ज्या साताऱ्यातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि खरे तर जगभर गाजली त्याचे प्रणेते दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पक नेतृत्वाच्या खडतर अशा अठरा वर्षांच्या संघषार्नंतर महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणा विरोधी कायदा नेमका काय आहे, याचा चित्ररथ करूनच त्या चित्ररथावरील स्टेज वर जिवंत बहारदार अशा चमत्कार सादरीकरणाचा देखावा सादर करण्यात आला.

भोंदू मांत्रिकाच्या वेशात भगवान रणदिवे चित्तथरारक चमत्काराचे सादरीकरण करत होते तर कार्यकर्त्याच्या भूमिकेत प्रशांत पोतदार त्या चमत्कारा मागील विज्ञान व हात चलाखी ग्रामस्थांना समजावून सांगत होते.
रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत रंगलेल्या या मिरवणुकीत जळता कापूर खाणे, जिभेतून त्रिशूळ आर-पार करणे, पाचशे टोकदार खिळ्यांच्या पाटावर झोपणे आदी चित्तथरारक चमत्कार पाहून धावडशीमधील हजारोंच्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आश्चर्य चकित झाले.

या सादरीकरणाला साथ होती, प्रभावी अशा चला गड्यांनो पाऊल टाका पुढ रं, उखडून टाकू अंधश्रद्धेची मूळ रं, गल्लो गल्ली गावामंधी, भोंदू बुवा वाढल,अशा बहारदार संगीतमय गीतांची. तरुणाई तर अगदी बेभान होऊन यावर नाचत होती.

पुरोगामी विचारांचा जागर


जत्रा-यात्रांमध्ये खरे तर अशा प्रकारे पुरोगामी विचारांचा प्रबोधनात्मक देखावा तोही जिवंत दाखवण्याची साताऱ्यातील ही पहिलीच घटना ठरली. जत्रा-यात्रांमध्ये अशाप्रकारे आगळावेगळा समाज प्रबोधन पायंडा पाडणाऱ्या तरुण मंडळातील युवकांचे अंनिसच्या वतीने कौतुक करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या चित्ररथाचे कौतुक गावातील अनेक मान्यवर नागरिकांनी केले.

Web Title: Artificial eradication from a recreational journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.