कलाकारांचे प्रश्न सोडविणार
By admin | Published: July 28, 2015 09:57 PM2015-07-28T21:57:05+5:302015-07-28T21:57:05+5:30
देवेंद्र फडणवीस : पंढरपूरला सेवेसाठी गेले साताऱ्यातील कलाकार
सातारा : ‘विठू माउलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना स्वच्छता व मनोरंजनाची सेवा देऊन स्वच्छता दूत बनलेल्या सर्व कलाकारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार,’ असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथून पंढरपुरात सेवा करण्यासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील कलावंतांच्या शिष्टमंडळाला दिली.माउलींच्या पंढरपुरातील लाखो वारकरी व भाविक यांना सुविधा देण्यासाठी कलावंतांनीही परिश्रम घेतले. या कलावंतांची भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. भारत भालके यांनी निवेदन स्वीकारले. महाराष्ट्रातील कलावंत संघटनेचे संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख, मनोहर पवार (सातारा) आदींसह सातारा जिल्ह्यातून दहा कलावंतांचे पथक दिंडीसोबत स्वच्छतेचेही अभियान राबवित आहेत. प्रशासकीय अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दहा वर्षांपूर्वी असा उपक्रम राबविला होता. शासन योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कलावंत खेड्यापाड्यात कार्यक्रम करतात, अशीही माहिती शहाबुद्दीन शेख, मनोहर पवार, माधव भोसले यांनी निदर्शनास आणले. यावेळी एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, तुकाराम मुंढे, खंडुजी गायकवाड, धर्मपाल सावंत, रमेश गिरी, अप्पासाहेब उगले उपस्थित होते. (प्रतिनिधी)