अरव, केतकीच्या उपचारासाठी थिरकणार पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:06 PM2018-06-03T23:06:23+5:302018-06-03T23:06:23+5:30
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आई-वडिलांचा रक्तगट समान असल्यास अपत्याच्या जन्मावेळी विशिष्ट इंजेक्शन द्यावे लागते; पण ते दिले न गेल्याने अरव चव्हाणला ऐकू व बोलता येत नाही. तसेच केतकी भोईटे या विवाहितेचे दोन्ही पाय प्रसूती काळात निकामी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांच्या आर्थिक मदतीसाठी अठरा डान्स अॅकॅडमीचे कलाकार मंगळवार, दि. ५ रोजी शाहू कलामंदिरमध्ये एकत्र येऊन थिरकणार आहेत.
साताऱ्यातील कोमल पवार यांच्या हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी गेल्यावर्षी सुमारे ५४ लाखांचा खर्च होता. तेव्हा कोमल पवार यांच्या उपचारासाठी याच सर्व कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला होता. त्यातून खूप मोठी मदत झाली.
त्याचप्रमाणे अरव चव्हाण हा अडीच वर्षीय बालक आहे. त्याच्या आई-वडिलांचा रक्तगट समान आहे; पण अरवच्या जन्मावेळी इंजेक्शन दिले नाही. त्याचा परिणाम अरवला आयुष्यभर सहन करावा लागत आहे. त्याला ऐकू किंवा बोलता येत नाही. इतर मुलांप्रमाणे अरवला ऐकता, बोलता यायला हवे, अशी त्याच्या आई-वडिलांचीअपेक्षा आहे. त्याला व्यवस्थित करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे; पण कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.
अरवप्रमाणेच केतकी भोईटे यांची अवस्था आहे. प्रसूतीकाळात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. एकवर्षीय सोनुल्याबरोबर आपणही खेळावे, असे त्या
माऊलीचे स्वप्न आहे. तिच्या कुटुंबीयांचीही हलाखीची
परिस्थिती असल्याने शस्त्रक्रिया करता येत नाही. केतकी भोईटे यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी
साताºयातील कलाकार एकत्र येत आहेत.
अरव आणि केतकी यांच्यासाठी साताºयातील शाहू कला
मंदिरमध्ये मंगळवार, दि. ५ रोजी ‘मेगा चॅरिटी शो’ आयोजित केला आहे. यासाठी साताºयातील सर्वच्या सर्व डान्स अॅकॅडमी एकत्र येत आहेत.
कोमल पवारची उपस्थिती
कोमल पवार यांच्यावरील हृदय अन् फुप्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी गेल्या वर्षी याच दिवशी याच अठरा डान्स अॅकॅडमी अन् दोनशे कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला होता. यातून सातारकरांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. कोमल पवार आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्या स्वत: मंगळवार, दि. ५ रोजी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन देणार आहेत.
या अॅकॅडमी सहभागी
एबीसीडी डान्स स्टुडिओ सातारा, अॅक्टिव्ह फ्लिपरस सातारा, मल्हार आॅरिअर्स, सातारा, पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी, सातारा, आकाश कला अॅकॅडमी, सातारा, ब्लॅक बॉईज् ग्रुप, सातारा, अपहोल्ड गु्रुप सातारा, फाईट क्लब सातारा, डान्स व्हिजन गु्रप सातारा, जयदेव भालेराव अॅकॅडमी, सातारा, नित्य साधना अॅकॅडमी, सातारा, बालगणेश कलामंच सातारा, के. जी. ग्रुप, सातारा, डी. व्हारस गु्रुप सातारा, डी२डी गु्रप सातारा, टीम आय गु्रप कºहाड हे संघ सहभागी होणार आहेत.