कृष्णा कारखान्यासाठी ३७० उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: May 26, 2015 01:02 AM2015-05-26T01:02:33+5:302015-05-26T01:02:48+5:30
निवडणूक : शेवटच्या दिवशी १०९ उमेदवारांचे अर्ज
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सोमवारी १०९ जणांनी १२५ अर्ज दाखल केले. दाखल अर्जांची संख्या ३७० वर पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर विभूते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कृष्णा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दि. २१ जूनला होत आहे. गटनिहाय अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : वडगाव हवेली दुशेरे गट : सुभाष जगताप, बाळासाहेब पाटील, अशोक जगताप, जयवंत जगताप, विलास पाटील, संभाजी मोरे, अक्षय पाटील, प्रतापसिंह जगताप, संभाजीराव जगताप, सर्जेराव लोकरे, जयवंत खबाले, प्रदीप पाटील, अशोक जगताप, उत्तम खबाले, मधुकर गुरव, सुरेश शिंदे, सुरेश माने.
काले कार्वे गट : विलास थोरात, राजेश जाधव, कृष्णराव थोरात, पोपटराव जाधव, मोहनराव थोरात, दयाराम पाटील, पांडुरंग पाटील, महादेव देसाई, गुणवंतराव पाटील, भगवानराव पाटील, गजेंद्र पाटील, आनंदराव थोरात, संभाजी थोरात.
नेर्ले-तांबवे गट : जयकर कदम, प्रताप माने, लक्ष्मण पाटील, जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, विक्रमसिंह पाटील, कृष्णाजी शेळके, वसंत पाटील, शिवाजीराव यादव, दिनकर मोरे, जगन्नाथ मोहिते, अशोक शिंदे, सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, सुरेश पाटील, प्रताप माने, जयशंकर यादव.
रेठरे हरणाक्ष- बोरगाव गट : मानसिंग पाटील, शहाजी पाटील, युवराज पाटील, सुभाष शिंंदे, केदारनाथ शिंदे, संजय घोरपडे, उमेश पवार, सर्जेराव पाटील, यशवंत पाटील, सयाजीराव पाटील, दामाजी मोरे, स्नेहल शिंदे, उदयसिंह शिंदे, सदाशिव पाटील. येडेमच्छिंद्र वांगी गट : सर्जेराव पाटील, शामराव पवार, दीपक पाटील, सुरेश पाटील, मुुकुंद जोशी, बाबासाहेब महिंद, शंकरराव कदम, राजाराम महिंद, पोपट मोरे, माणिकराव मोरे. रेठरे बुद्रुक -शेणोली गट : आदित्य मोहिते, जयवंत पाटील, बाळासाहेब निकम, जयेश मोहिते, अविनाश मोहिते, दीपक कणसे, चंद्रकांत पवार.अनुसूचित जाती गट : महिंद्र मोहिते, अधिकराव मानकर-कांबळे, शिवाजी आवळे.महिला राखीव गट : सुस्मिता जाधव, मीनाक्षी पाटील, जयश्री पाटील, क्रांती पाटील, सुरेखा रामचंद्र पाटील, सुरेखा राजेंद्र पाटील, कांचनमाला जगताप, हेमा कणसे, सिंधुताई कदम, मालन पाटील, विजया कणसे, वैशाली पाटील, छाया पाटील, बाळूताई मोरे-पाटील, उमा देसाई, स्नेहल शिंदे. इतर मागासवर्गीय जातीचा गट : चंद्रशेखर विभुते, जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, अमोल गुरव, विजय रणदिवे, ज्ञानदेव माळी. भटक्या विमुक्त जाती जमाती गट : राजेंद्र हुबाले, संभाजी इरकर, नितीन खरात, विलास मदने, सुभाष मदने, दत्तात्रय वाटेगावकर. (प्रतिनिधी)