आर्वीत पत्रे उडाली : घरावर पडले झाड, साप येथील शेवग्याची झाडे मोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:41 PM2020-04-30T17:41:19+5:302020-04-30T17:42:30+5:30
. मात्र शेंगांनी लगडलेली झाडे वादळी वाºयाने मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंत पवार यांचा शेतकरी मुलगा संदीप ऊर्फ चंद्र्रकांत पवार यांनी केली आहे.
रहिमतपूर : वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
रहिमतपूर परिसरात बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास वादळी पाऊस कोसळला. या पावसाने आर्वी येथील संतोष डोंबे या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडचा पत्रा सुमारे दहा फूट दूरवर उडून पडला. पिंपळाचे झाड घरावर पडल्याने आर्वी येथीलच सुवर्णा जाधव यांच्या घराच्या भिंतीला तडा गेला असून, पत्रा मोडला आहे. तसेच वादळी वाºयामुळे प्रल्हाद गायकवाड यांच्या घराची पत्र्याची पाने उडून मोठे नुकसान झाले. घटनास्थळी भेट देऊन तलाठी व मंडलाधिकारी विनोद सावंत यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
दरम्यान, साप येथील वसंत शिदू पवार या शेतकºयांच्या रायगावचा माळ नावाच्या शिवारातील अडीच एकर क्षेत्रांमध्ये लावलेल्या शेवग्याच्या बागेतील काही झाडे वादळी पावसाने अर्ध्यातूनच मोडून पडली आहेत. लाखो रुपये खर्च करून शेवग्याची बाग जपली होती. नुकतेच पंधरा दिवसांपासून शेवग्याच्या शेंगा तोडणीस सुरुवात केली होती. मात्र शेंगांनी लगडलेली झाडे वादळी वाºयाने मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंत पवार यांचा शेतकरी मुलगा संदीप ऊर्फ चंद्र्रकांत पवार यांनी केली आहे.
झाडांखाली आंब्यांचा खच
पावसापेक्षा वाºयाचा वेग जोरदार असल्यामुळे रहिमतपूर परिसरातील गावांमधील आंबे मोठ्या प्रमाणात झडून झाडाखाली आंब्यांचा खच पडला आहे. आंब्याच्या झाडाला मोहोर येताना ढगाळ वातावरण व धुकटाचा फटका बसल्याने अगोदरच मोहोराचे प्रमाण कमी होते. या रोगातून काही झाडांना थोड्या प्रमाणात आंबे लागले होते. मात्र पाड लागण्याच्या कालावधीतच वादळी पावसाचा झटका बसल्याने चुकारीचे आंबेही झडून गेले आहेत.