आसरा कादंबरी ग्रामीण साहित्याचा हुंकार : श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:34 AM2021-01-18T04:34:44+5:302021-01-18T04:34:44+5:30
किडगाव : ‘ग्रामीण जाणिवा आज बोथट होत असताना आसरा ही ग्रामीण कादंबरी खेडे आणि शहरातील बदलत्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. ...
किडगाव : ‘ग्रामीण जाणिवा आज बोथट होत असताना आसरा ही ग्रामीण कादंबरी खेडे आणि शहरातील बदलत्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी ही कादंबरी ग्रामीण साहित्याचा एक हुंकार आहे. वास्तव जीवनातील मानवी स्वभावाच्या बारीक-सारीक छटा लेखक सुरेश पाटोळे यांनी टिपल्या आहेत,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
सुरेश कृष्णाजी पाटोळे यांच्या ‘आसरा’ या कादंबरीचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विश्वास वसेकर हे होते. याप्रसंगी कवी व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे, म.सा.प.चे कार्यवाह शिरीष चिटणीस, चित्रकार सुरेश नावडकर, अभियंता मनोहर कोलते, ललिता सबनीस, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त पोलीस निरीक्षक कवी सीताराम नरके, प्रकाशक निखील लंभाते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. विश्वास वसेकर म्हणाले, इंग्रजीतील बेस्ट सेलर लेखक आपल्या लेखनासाठी खूप परिश्रम घेतात. तसेच प्रयत्न मराठी लेखकांनीही आपल्या लेखनाबद्दल घेतले पाहिजेत. सुरेश पाटोळे अशीच लेखननिष्ठा जपून लेखन करतात, त्यामुळे ते एक यशस्वी लेखक आहेत.
उद्धव कानडे म्हणाले, ‘लेखकाने कारुण्याने भरलेले झाड असले पाहिजे. तर त्याची कलाकृती रसिकांच्या मनाला भिडते. तेच कारुण्य पाटोळे यांच्या लेखनात दिसते.’
यावेळी प्रकाशक प्रा. रुपाली अवचरे यांनी प्रास्ताविक केले. तर निखील लंभाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.