पार्लेत सरपंचपदी अश्विनी मदने, उपसरपंचपदी मोहन पवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:30+5:302021-02-26T04:53:30+5:30

पार्ले येथे सरपंच पदासाठी एकच, तर उपसरपंचपदी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंचपदी अश्विनी ...

Ashwini Madane as Sarpanch in Parle, Mohan Pawar as Deputy Sarpanch unopposed | पार्लेत सरपंचपदी अश्विनी मदने, उपसरपंचपदी मोहन पवार बिनविरोध

पार्लेत सरपंचपदी अश्विनी मदने, उपसरपंचपदी मोहन पवार बिनविरोध

Next

पार्ले येथे सरपंच पदासाठी एकच, तर उपसरपंचपदी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंचपदी अश्विनी मदने आणि उपसरपंच पदासाठी मोहन पवार यांची नावे जाहीर केली. नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ चाळके यांनी केला.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या शुभांगी नलवडे, सुनंदा निकम, वंदना शिवदास, तसेच विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष गोरख नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, आप्पासाहेब वदक, संभाजी नलवडे, दादासाहेब निकम, तुकाराम नलवडे, पंडित नलवडे, दिनकर नलवडे, कृष्णा मदने, सागर नलवडे, बाळकृष्ण नलवडे, नंदकुमार नलवडे, अजित पाटील, सुभाष मिसाळ, आनंदा नलवडे, अनिल नलवडे, सुभाष नलवडे, पांडुरंग पाटील, भिकाजी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते.

फोटो : २५केआरडी०१

कॅप्शन :

पार्ले, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच, उपसरपंचांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ चाळके यांच्याहस्ते करण्यात आला.

Web Title: Ashwini Madane as Sarpanch in Parle, Mohan Pawar as Deputy Sarpanch unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.