सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:30+5:302021-06-03T04:27:30+5:30

स्टार ७६४ (टेम्पलेट विषय) तोंड दाबून बुक्क्यांचा मार; वारंवार मागणी करून देखील प्रशासन लक्ष देईना लोकमत न्यूज नेटवर्क सातारा ...

Ask the person giving the cylinder, did you get the vaccine? | सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?

सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?

Next

स्टार ७६४

(टेम्पलेट विषय)

तोंड दाबून बुक्क्यांचा मार; वारंवार मागणी करून देखील प्रशासन लक्ष देईना

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : घरात गॅस सिलिंडर नसेल तर काय दैना होते, हे आपण नेहमीच पाहतो; मात्र गॅस सिलिंडर आपल्याला घरपोच देणारा सिलिंडर बॉय कोरोना महामारीच्या काळात देखील जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहे, त्यांच्या लसीकरणाकडे मात्र प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

सातारा शहरामध्ये गॅस एजन्सीकडे काम करणाऱ्या केवळ २५ जणांनीच लसीकरण मोहिमेत डोस घेतला. वयाचे ४५ वर्षे पूर्ण केले असल्याने त्यांना इतर नागरिकांप्रमाणे लस घेण्याचा अधिकार मिळाला; मात्र सिलिंडर पोहोचवणारे लोक हे वयाच्या ४५ च्या आतील जास्त असतात. त्या लोकांना लसीकरण मिळायला पाहिजे होते, ते अद्याप मिळालेले नाही. कामाची गरज आहे आणि लोकांची सेवा करायची आहे, या दोन्ही उद्देशाने हे डिलिव्हरी बॉय धोका पत्करून देखील सेवा बजावत आहेत.

१) पॉईंटर्स

शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक - ७८ हजार ९२०

गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी - ६

घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - ११०

किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - २५

किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - १०

एकही डोस न घेणारे कर्मचारी - ८५

२) १३ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह (बॉक्स)

शहरात आतापर्यंत १३ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह आले आहेत. स्वयंपाकाचा गॅस प्रत्येकाला लागतो. चौथ्या मजल्यावर राहतात त्यांना देखील डिलिव्हरी बॉयने गॅस आणून द्यावा अशी लोकांची अपेक्षा असते. प्रत्येकाच्या घरी गेल्यामुळेच गॅस डिलिव्हरी बॉयला जास्त धोका आहे

याचा बॉक्स.

३) डिलिव्हरी बॉय म्हणतात...

कोट..

आमच्या गॅस एजन्सीतर्फे डिलिव्हरी बॉयला तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र अजून वय वर्षे ४५ पूर्ण न झालेल्या कामगारांना लस दिली जात नाही.

- मंगेश कुंभार

कोट....

आम्ही फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करतो आहे. आमच्या कामामध्ये वय वर्षे ४५ च्या आतील लोक मोठ्या संख्येने काम करतात. मात्र या वयोगटातील कुणालाही लस दिली गेली नाही.

- शंकर शिंदे

४) जबाबदारी कोणाची?

जिल्ह्यात सर्वच नागरिकांना लस मिळायला पाहिजे, ही प्रशासनाची भूमिका आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी

५) सिलिंडर सॅनिटाईज केले का? (बॉक्स)

कोरोनापासून बचावासाठी सिलिंडर घरात घेतल्यानंतर त्याला सॅनिटाईज करून घ्यायला हवे. कंपनीत निर्माण झाल्यापासून ते घरांमध्ये पोहोचेपर्यंत अनेकांचे हात सिलिंडरला लागलेले प्रशासनाकडे मिनतवाऱ्या तसेच लोकांचा संपर्क देखील झालेला असतो, हे लक्षात घेऊन संपूर्ण सिलिंडरवर सॅनिटायझर फवारावे.

Web Title: Ask the person giving the cylinder, did you get the vaccine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.