कऱ्हाड पडलं मागं; फलटणचा दुसरा क्रमांक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:52+5:302021-05-25T04:43:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून आतापर्यंत दीड लाखावर रुग्ण आढळून आले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून आतापर्यंत दीड लाखावर रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक ३३ हजारांवर रुग्णांची नोंद ही सातारा तालुक्यात झाली आहे. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तसेच फलटण तालुक्यातील बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने, कऱ्हाड मागे पडले, फलटण तालुका रुग्णांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा वेग वेगाने वाढला. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर एप्रिल महिन्यापासून हजारात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे एका दिवसात अडीच हजारावर ही बाधित संख्या गेली. परिणामी सद्यस्थितीत एकूण रुग्णसंख्या दीड लाखावर गेली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १ लाख ५१ हजार ३८७ रुग्णसंख्या नोंद झाली आहे. यामधील ३३३३३ कोरोना रुग्ण हे एका सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत, तर यानंतर फलटण तालुक्याचा क्रमांक लागतो. सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार कऱ्हाडला मागे टाकून फलटण दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. फलटण तालुक्यात आता २१ हजारांवर रुग्ण आहेत. कऱ्हाड तालुक्यातीलही बाधितांची संख्या २०८८० झालेली आहे. इतर तालुक्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, महाबळेश्वर तालुका पाठीमागे आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ३४५६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो.
चौकट :
मे महिन्यात फलटणला ७२८६ रुग्ण वाढले...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांत सातारा एक, तर कऱ्हाड तालुका दुसऱ्या क्रमांकावर होता. पण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कऱ्हाडपेक्षा फलटण तालुक्यात बाधितांचा वेग अधिक राहिला. मे महिन्यात आतापर्यंत फलटण तालुक्यात ७२८६ बाधित स्पष्ट झाले, तर कऱ्हाडला ४७५३ रुग्णांची नोंद झाली. फलटणमधील रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने कऱ्हाड तालुका मागे पडला आहे, तर फलटण तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
चौकट :
तालुकानिहाय नोंद... कोरोना आकडेवारी
तालुका बाधित मृत
सातारा - ३३३३३ ९७१
कऱ्हाड - २०८८० ६०२
फलटण - २११६२ २४२
कोरेगाव - १३१६९ २९९
वाई - ११०३५ २९२
खटाव - १४०१४ ३८१
खंडाळा - ९४९३ १२४
जावळी - ६९७९ १५८
माण - १०२९२ १९५
पाटण - ६१८९ १५०
महाबळेश्वर - ३८८९ ४२
इतर - ९५२ ...
.....................................................