मतांसाठी येणाऱ्यांना टोलचं विचारा ; नेटकरी आक्रमक : तिन्ही जिल्ह्यांतील वाहनचालकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:05 PM2019-10-15T22:05:16+5:302019-10-15T22:05:34+5:30

तोपर्यंत पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद करण्याची मोहीम सध्या जोरकसपणे सुरू आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे कॅम्पेन आता सामान्यांपर्यंत पोहोचू लागलं आहे. सुविधा नाहीत तर टोलही नाही, अशी वाहनचालकांची मानसिकता असल्याचे याद्वारे व्यक्त झाले.

Ask the toll for those who come to vote; Network offensive: Appeal to drivers in all three districts | मतांसाठी येणाऱ्यांना टोलचं विचारा ; नेटकरी आक्रमक : तिन्ही जिल्ह्यांतील वाहनचालकांना आवाहन

मतांसाठी येणाऱ्यांना टोलचं विचारा ; नेटकरी आक्रमक : तिन्ही जिल्ह्यांतील वाहनचालकांना आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देजोपर्यंत आवश्यक सोयी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत

सातारा : निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांपर्यंत नेते आणि कार्यकर्ते पोहोचत आहेत. मतांसाठी समोर येणाºया नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुविधा उपलब्ध करून देईपर्यंत टोल बंद करणार का, हे विचारा. त्याचं उत्तर मिळाल्यानंतरच मतदानाचं ठरवा, असा पवित्रा नेटिझन्सनी घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पुणे-सातारा प्रवास करताना रस्त्याची दुर्दशा आणि सोयींची वानवा दिसते. जोपर्यंत आवश्यक सोयी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद करण्याची मोहीम सध्या जोरकसपणे सुरू आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे कॅम्पेन आता सामान्यांपर्यंत पोहोचू लागलं आहे. सुविधा नाहीत तर टोलही नाही, अशी वाहनचालकांची मानसिकता असल्याचे याद्वारे व्यक्त झाले.

रस्त्यांची दुर्दशा कमी झाल्याशिवाय टोल न देण्याचा पवित्रा पुण्यातून कोल्हापूरपर्यंत प्रवास करणाऱ्यांनी घेतला आहे. या मोहिमेत साताºयासह सांगली अणि कोल्हापूर येथून प्रवास करणा-यांची संख्या मोठी आहे. निवडणुकीच्या निमित्ताने नेते आणि कार्यकर्ते सामान्यांच्या घरापर्यंत जात आहेत. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांद्वारे व्यक्त होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

स्टिकर लावून मतदानाला या
नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असणारे सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथील मतदार सोमवारी मतदानासाठी आपापल्या गावी येणार आहेत. मतदानासाठी येताना आपल्या गाडीवर ‘दे धक्का’ असं स्टिकर लावून येणार आहेत. याचे ई-स्टिकर समाजमाध्यमांतून व्हायरल करण्यात येणार आहेत. हे स्टिकर लावून येणारे टोलला विरोध करणार आहेत.

टोल फ्री, होल फ्री अन् झोल फ्रीची साद
मूलभूत सोयींची वानवा असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांविषयी नेटिझन्समध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी टोल फ्री, होल फ्री आणि झोल फ्री याद्वारे रस्त्यांची मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हॅशटॅगने हे शब्द या रस्त्यांवरून प्रवास करणाºया अनेकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 

पुणे-सातारा प्रवास करून येणाºयांना किती तास लागले? हा प्रश्न ठरलेलाच असतो. खड्ड्यांची कसरत केल्यानंतर टोलनाक्यांवरील रांगा पारा चढवणाºया आहेत. शनिवार, रविवारी या रस्त्याने प्रवास करणं हीच मोठी शिक्षा वाटते. त्यामुळे या मतदानाला समोर येणाºया नेत्यांना याचा जाब विचारा.
- संदीप गायकवाड, पुण्यातील सातारकर

Web Title: Ask the toll for those who come to vote; Network offensive: Appeal to drivers in all three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.