वीजबिल जास्त आले म्हणून सहायक अभियंत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:33+5:302021-06-19T04:25:33+5:30

म्हसवड : ‘माझे लाइटबिल जास्त का आले आहे’, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनी सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी ...

Assault on assistant engineer due to high electricity bill | वीजबिल जास्त आले म्हणून सहायक अभियंत्यास मारहाण

वीजबिल जास्त आले म्हणून सहायक अभियंत्यास मारहाण

Next

म्हसवड : ‘माझे लाइटबिल जास्त का आले आहे’, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनी सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शहरात घडली.

याबाबतची म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसवड येथील शहर शाखेतील सहायक अभियंता रोहित दिलीप तायडे (वय २९, सध्या रा. शिक्षक काॅलनी, म्हसवड, मूळ गाव जळगाव) हे व त्यांचे सहकारी कर्मचारी महादेव चव्हाण, दिनेश गायकवाड यांच्यासह महावितरण कार्यालयात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास काम करीत बसले होते. त्यावेळी अनिल बबनराव पोळ (रा. म्हसवड) तेथे आले. त्यांनी त्यांच्या नावाचे ‘सागर बीअर बारचे लाइटबिल जास्त का आले आहे’, असे विचारले. त्यानंतर, याच कारणांवरून हुज्जत घालत, शिवीगाळ करू लागले म्हणून त्यांना तुम्ही का शिवीगाळ करता, अशी विचारणा केली असता, त्यांनी सहायक अभियंत्याला डाव्या कानावर हाताने मारले. तसेच डोळ्यांवरील चष्मा काढून घेऊन फोडून शासकीय कामात अडथळा आणला. त्यावेळी चष्म्याची काच फुटून माझ्या डोळ्याच्या बाजूस व नाकावर इजा झाली आहे, अशी तक्रार सहायक अभियंता तायडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास म्हसवड पोलीस करीत आहेत.

Web Title: Assault on assistant engineer due to high electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.