अथण- रयतचे ३१ जानेवारीअखेरीला ऊस बिल बँक खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:03+5:302021-02-19T04:29:03+5:30

कराड : शेवाळेवाडी-म्हासोली, (ता. कराड ) येथील अथणी-रयत साखर कारखान्याने सन २०-२१ मधील( दि. १६ ) जानेवारी ते ...

Athan: Rayat's sugarcane bill deposited in his bank account at the end of January 31 | अथण- रयतचे ३१ जानेवारीअखेरीला ऊस बिल बँक खात्यावर जमा

अथण- रयतचे ३१ जानेवारीअखेरीला ऊस बिल बँक खात्यावर जमा

googlenewsNext

कराड : शेवाळेवाडी-म्हासोली, (ता. कराड ) येथील अथणी-रयत साखर कारखान्याने सन २०-२१ मधील( दि. १६ ) जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१या

पंधरवड्यातील गळीत केलेल्या उसाचे प्रति मेट्रिक टन २९०० रुपयांप्रमाणे ऊस बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर गुरुवारी ( दि. १८) रोजी जमा केले असल्याची माहिती अथणी शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.

यावेळी रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, युनिट हेड रवींद्र देशमुख उपस्थित होते. अथणी शुगर्सच्या रयत युनिटने चालू गळीत हंगामात आजअखेर ११६ दिवसांत ३,५५,४२० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १२.०२ टक्क्यांनी साखर उतारा राखत ४,२२,२७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास व शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास एफ.आर.पी. २८६७ रुपये इतकी असताना एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यापुढेही उसाला वेळेवर आणि चांगला दर देण्याची भूमिका अथणी शुगर्सची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करुन सन २०-२१करिता निश्चित केलेले ५,००,००० मेट्रिक टन गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीतजास्त ऊस अथणी शुगर्स रयत युनिट या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

फोटो- योगेश पाटील व उदयसिंह पाटील

--

Web Title: Athan: Rayat's sugarcane bill deposited in his bank account at the end of January 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.