ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी खेळाडूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:57+5:302021-01-16T04:42:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ऑलिम्पिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला सन १९५२ साली पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी (दि. १५ जानेवारी) सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रावीण्यप्राप्त खेळाडू व राज्य क्रीडा पुरस्कारार्थींचा ट्रॅकसूट, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्या वतीने प्रतिवर्षी गौरव करण्यात येतो. परंतु यावर्षी कोविड-१९ विषांणूच्या प्रादुर्भावामुळे व ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाकरिता शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुजित शेडगे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी आदित्य अहिरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी यांनी प्रथमतः पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांना विनम्र अभिवादन केले.
तसेच प्राथमिक स्वरूपात राष्ट्रीय खेळाडू प्रशांत शिंदे, कुस्ती, पवन शिंदे, कुस्ती, आयुष मोकाशी, बॉक्सिंग, मधुर भोसले, बॉक्सिंग या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी राजेंद्र अतनूर, सुनील कोळी, क्रीडाधिकारी, दत्तात्रय माने, क्रीडा मार्गदर्शक, संतोष साबळे, वरिष्ठ लिपिक, अरविंद माळी व जिल्हा क्रीडासंकुल कर्मचारी, आदी उपस्थित होते.
फोटो नेम : १५सागर
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा क्रीडासंकुलात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुजित शेडगे व इतर मान्यवरांनी अभिवादन केले.