मरिआईचीवाडीत कोंबड्या दगावल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:13+5:302021-01-16T04:43:13+5:30

सातारा : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले ...

An atmosphere of fear due to the slaughter of hens in Mariaichiwadi | मरिआईचीवाडीत कोंबड्या दगावल्याने भीतीचे वातावरण

मरिआईचीवाडीत कोंबड्या दगावल्याने भीतीचे वातावरण

Next

सातारा : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मरिआईचीवाडी येथील सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तोपर्यंत दहा किलोमीटर क्षेत्र सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

याबाबत माहिती अशी की, मरिआईचीवाडी कापरेवस्ती, शिंदेवस्ती येथे गुरुवारी अचानक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण अधिनियम २००९मधील तरतुदीनुसार मरिआईचीवाडी येथील दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून आदेशान्वये जाहीर केला आहे.

या आदेशानुसार प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यास मनाई आहे. त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कोंबड्या, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषांगिक साहित्य व उपकरणे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे. प्रभावित पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यासंबंधीतच्या सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रिज्येतील परिसरात प्रभावित पक्ष्यांच्या आजारांचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा, प्रदर्शन इत्यादी बाबी बंद राहतील. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title: An atmosphere of fear due to the slaughter of hens in Mariaichiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.