भोंदूबाबाच्या मठात चिमुकलीवर अत्याचार

By admin | Published: June 29, 2016 12:02 AM2016-06-29T00:02:02+5:302016-06-29T00:07:29+5:30

खटाव तालुका : गुरू-शिष्यावर गावकऱ्यांकडून हल्ला; मारहाणीच्या चित्रीकरणाचा प्रयत्न

Atrocities against Chimukulla in Bhondubaba Math | भोंदूबाबाच्या मठात चिमुकलीवर अत्याचार

भोंदूबाबाच्या मठात चिमुकलीवर अत्याचार

Next

वडूज : खटाव तालुक्यातील एका गावात सातवर्षीय शाळकरी बालिकेवर मठातील भोंदू बाबाच्या शिष्याने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही वार्ता समजताच गावातील युवकांनी त्या शिष्यास चोप दिला, तेव्हा या भोंदू बाबाने मोबाईलमधून मारहाणीचे चित्रीकरण करून धमकी दिल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबतची माहिती अशी, खटाव तालुक्यात हणमंत बुवा रामदासी या भोंदू बाबाचा मठ आहे. तालुक्यातील एक मुलगी आठ दिवसांपूर्वी या मठात गेली होती. त्यावेळी महाराजांचा शिष्य योगेश शामराव जाधव (वय २५, रा. गुरसाळे) याने एकटी मुलगी गाठून तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी मुलीस त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडला प्रकार आईस सांगितला. त्यावेळी आईने महाराजांना जाब विचारला. मात्र भोंदू बाबांनी घडल्या प्रकाराबद्दल कोठेही वाच्यता करू नका, मी जाधव यास मठातून हाकलून देतो. तसेच घटनेबाबत जास्त चर्चा केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. त्यानंतर शिष्य व महाराज आठवडाभर परागंदा झाले होते.
दरम्यान, घटनेबाबत गावातील लोक शांत असून कसलाही गोंधळ झाला नाही, हे पाहून मंगळवारी (दि. २८) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काहीच घडले नाही, अशा आर्विभावात महाराज मठात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर गावातील युवकांनी तातडीने मठ गाठला. तेथे शिष्यास चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी महाराजाने अशी मारहाण करु नका, तुम्हास जड जाईल, असे म्हणत मोबाईलवरुन चित्रीकरण केले.
लोकांचा संताप अनावर झाल्यानंतर युवकांनी महाराज हणमंत बुवा व त्याचा शिष्य योगेश जाधव या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities against Chimukulla in Bhondubaba Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.