चुलत भावासह दोघांचा सातवीतील मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:46+5:302021-06-24T04:26:46+5:30

सातारा/दहिवडी : सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावासह दोघांनी अत्याचार केला असून, यातून संबंधित मुलगी सात महिन्यांची गर्भवती ...

Atrocities on seventh girl by two including cousin | चुलत भावासह दोघांचा सातवीतील मुलीवर अत्याचार

चुलत भावासह दोघांचा सातवीतील मुलीवर अत्याचार

Next

सातारा/दहिवडी : सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावासह दोघांनी अत्याचार केला असून, यातून संबंधित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माण तालुक्यातील एका गावातील मुलगी सातवीमध्ये शिकत आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाने तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तर पीडित मुलीच्या पंधरा वर्षांच्या चुलत भावाने तुमचे लफडे मला माहीत आहे. मी इतरांना सांगेन, असे म्हणून ब्लॅकमेल करून बहिणीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर मुलीला याबाबत विचारल्यानंतर तिने या घृणास्पद प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. आईने तत्काळ दहिवडी पोलिसांना याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी तत्काळ संबंधित दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. यातील एक मुलगा १९ वर्षांचा आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे.

चौकट : महिन्याभरात दुसरी घटना..

जावळी तालुक्यामध्येही गेल्या काही दिवसांपूर्वी एका सातवीतील मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेतही संबंधित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. असे असताना पुन्हा माण तालुक्यामध्ये या प्रकाराची पुरावृत्ती झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Atrocities on seventh girl by two including cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.