पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर अॅट्रॉसिटीची गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:53 PM2020-10-31T12:53:14+5:302020-10-31T12:56:48+5:30
Atrocity Act, crimenews, police, sataranews पवारवाडी (दरुज) येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत असताना त्यांची करडे शेजारच्या शेतात गेली म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पवारवाडी (दरुज) येथील दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर लावंड व सतीश विलास लावंड (रा. पवारवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
पुसेगाव : पवारवाडी (दरुज) येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत असताना त्यांची करडे शेजारच्या शेतात गेली म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पवारवाडी (दरुज) येथील दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर लावंड व सतीश विलास लावंड (रा. पवारवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा कैलास पवार व मुलगा नीलेश कैलास पवार हे पवारवाडी येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत होते. शेळ्यांची करडे जवळच्या सतीश पवार यांच्या शेतात गेली म्हणून प्रभाकर लावंड यांनी आशा पवार यांना आमच्या शेतात पुन्हा शेळ्या चारायच्या नाहीत, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
लाकडी काठीने मारहाण करत डोक्याचे केस ओढून जमिनीवर आपटले. तसेच प्रभाकर लावंड व सतीश लावंड यांनी मुलगा नीलेश याला ही लाथाबुक्क्या व हाताने मारहाण केली. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जी. आर. किंद्रे तपास करत आहेत.