साताऱ्यात दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:41+5:302021-07-30T04:40:41+5:30
सातारा : घर खाली करण्यासाठी जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
सातारा : घर खाली करण्यासाठी जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल हनुमंत किर्दात (वय ३०, रा. संगमनगर सातारा), सतीश पांडुरंग निकम (वय ४०, रा. करंजे पेठ सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सुनीता रमेश येवले (वय ४८, रा. करंजे पेठ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार करंजे पेठेतील सुमन नामदेव देशमुख यांच्या घरात त्या भाड्याने राहत आहेत. त्या मूळच्या कोरेगाव येथील आहेत. त्यांनी भाड्याने घेतलेली रूम खाली करण्यासाठी दोघा संशयितांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच घरातील लाइट आणि पाणीदेखील त्यांनी बंद केले. या प्रकारामुळे त्यांची गैरसोय झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अचल दलाल या अधिक तपास करत आहेत.