वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी दहा फूट खड्ड्यात, सहाजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:17 PM2017-10-30T12:17:28+5:302017-10-30T16:29:23+5:30
धोकादायक वळण अन् दाट झाडीमुळे एसटी न दिसल्याने भरधाव आलेल्या वडाप जीपने एसटीला जोदार जोरदार धडक दिली. यामध्ये वडापमधील सहाजण जखमी झाले असून, त्यामध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. अपघातावेळी वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी पुलाच्या पुढील बाजूला असलेल्या दहा फूट खड्ड्यात जाऊन उलटली. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वासात वाजता झाला.
सातारा ,दि. ३० : धोकादायक वळण अन् दाट झाडीमुळे एसटी न दिसल्याने भरधाव आलेल्या वडाप जीपने एसटीला जोदार जोरदार धडक दिली. यामध्ये वडापमधील सहाजण जखमी झाले असून, त्यामध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. अपघातावेळी वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी पुलाच्या पुढील बाजूला असलेल्या दहा फूट खड्ड्यात जाऊन उलटली. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वासात वाजता झाला.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराची सातारा-वडूज (एमएच १२ एक्यू ६९५०) पाच प्रवासी घेऊन वडूजच्या दिशेन निघाली होती.
ही बस जैतापूर हद्दीत आली असता. एका पुलावरील दाट झाडी अन् धोकादायक वळणामुळे रहिमतपूरकडून येत असलेल्या वडाप चालकाला एसटी दिसली नाही. त्याने एसटीला जोरदार धडक दिली.
या अपघातात जीपचालक रवींद्र श्रीरंग मतकर (वय ३५), यशवंत रामचंद्र साखरे (वय ६७, दोघेही रा. तांदुळवाडी, ता. कोरेगाव), बाबूराव रोहिदास जाधव (वय ७२), मंदा लक्ष्मण साळोखे (वय ३८), सुवर्णा लक्ष्मण गवळी (वय ३०, तिघेही रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) आणि सुरेश रामचंद्र कदम (वय ५०, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) हे सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुगालयात उपचार सुरू आहेत. सातारा तालुका पोलिस अपघातग्रस्तांकडून माहिती घेत आहेत.
फुटलेल्या काचेतून प्रवासी बाहेर
एसटी बस रस्ता सोडून दहा फूट खोल खड्ड्यात गेली. या ठिकाणी असलेल्या झाडीमुळे ती अडकल्यामुळे अनर्थ टळला. परंतु एसटीतील पाच प्रवासी अन् चालक-वाहक एसटीतच अडकले होते. खड्ड्यात जाऊन उलटली गेली. वाहकाची बाजू बंद झाल्याने चालकासमोरील फुटलेल्या काचेतून प्रवासी अन् चालक-वाहक बाहेर पडले.