पराभव टाळण्यासाठी प्रलोभनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:49+5:302021-06-26T04:26:49+5:30

कराड /इस्लामपूर कृष्णा कारखान्याची हाती असलेली सत्ता जाऊन मोठ्या फरकाने होणारा पराभव टाळण्यासाठी बड्या नेत्यांना पॅकेज आणि छोट्या कार्यकर्त्यांना ...

Attempt of temptation to avoid defeat | पराभव टाळण्यासाठी प्रलोभनाचा प्रयत्न

पराभव टाळण्यासाठी प्रलोभनाचा प्रयत्न

Next

कराड /इस्लामपूर

कृष्णा कारखान्याची हाती असलेली सत्ता जाऊन मोठ्या फरकाने होणारा पराभव टाळण्यासाठी बड्या नेत्यांना पॅकेज आणि छोट्या कार्यकर्त्यांना पाकीट देण्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत. सहकार पॅनेलच्या मागे सभासदांचा पाठिंबा नसल्याने ट्रस्टवरील कामगार आणि शिक्षण संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी घेऊन त्यांना फिरावे लागत आहे. यावरून भोसले यांनी निवडणुकीपूर्वी आपली हार मानली असल्याचे मत नूतन जगन्नाथ मोहिते यांनी व्यक्त केले.

संस्थापक पॅनेल उमेदवारांच्या प्रचारार्थ लवंडमाची, बेरडमाची (ता. वाळवा) येथील सभासदांशी संवाद साधताना नूतन मोहिते बोलत होत्या. यावेळी बाबासाहेब पाटील, मधुकर डिसले, पंडित माळी, अविनाश पाटील, उत्तम डिसले, महादेव डिसले, राहुल निकम, तानाजी यादव, जयवंतराव मोरे, प्रकाश साळुंखे उपस्थित होते.

नूतन मोहिते म्हणाल्या, कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी ज्या दिवशी ऊस उत्पादक सभासदांना अक्रियाशीलतेच्या नोटिसा काढल्या त्याच दिवशी भोसले यांना सत्तेतून दूर करण्याचा सभासदांनी निश्चय केला आहे. आता निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिली आहे.

अविनाश मोहिते यांनी त्यांच्या काळात सभासदासाठी सुरू केलेल्या आरोग्यविषयक योजना भोसले यांनी बंद पाडल्या. कृषी प्रदर्शन बंद केले. यावरून भोसले यांची सभासदाप्रति असलेली दुष्ट भावना दिसून येते. माझ्या मुलास त्यांनी कपटाने राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र कारखान्याचे सभासद सुज्ञ असून ते संस्थापक पॅनेलच्या पाठीशी कायम राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Attempt of temptation to avoid defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.