साताऱ्यात ॲसिड टाकून झाड जाळण्याचा प्रयत्न
By प्रगती पाटील | Published: March 18, 2024 06:50 PM2024-03-18T18:50:07+5:302024-03-18T18:50:21+5:30
सातारा : झाड माणसाला शुध्द प्राणवायू देते, पाऊस देते, पांतस्थाला आश्रय देतं. तरीही माणूस त्याच्या मुळावर उठलाय..साताऱ्यातील वायसी कॉलेजसमोर, ...
सातारा : झाड माणसाला शुध्द प्राणवायू देते, पाऊस देते, पांतस्थाला आश्रय देतं. तरीही माणूस त्याच्या मुळावर उठलाय..साताऱ्यातील वायसी कॉलेजसमोर, एका झाडाच्या मुळावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यावर ॲसिड टाकत झाड जाळून मारण्याचा प्रयत्न सोमवारी उघडा झाला. आपले घर, ऑफिस तसेच शहरातील रस्त्याकडेला लावलेली झाडं माणसाला शुद्ध प्राणवायू, मोकळी हवा, सावली देतात. त्या बदल्यात झाड माणसाकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही. सजीवाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या झाडांच्या मुळावर माणूस का उठलाय हे कळायला मार्ग नाही.
पोवईनाका ते गोडोली अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. गेल्या सात- आठ वर्षात ही झाडे चांगली बहरली आहेत. रस्त्याकडेला लावलेली झाडे कोणाच्या आध्यात ना मध्यात तरीही त्यावर ऍसिड टाकून जाळून मारण्याचा दुर्दैवी प्रयत्न माथेफिरूने केल्याचे उघडकीस आले. शनिवार- रविवार महाविद्यालयाला सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याचा अंदाज घेत माथेफिरूने हे कृत्य केले आहे.