कामावरून काढल्याने सिव्हिलच्या सफाई कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 09:17 PM2020-08-07T21:17:50+5:302020-08-07T21:28:45+5:30
सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयातून मृत स्त्री भ्रुण बाहेर काढणाºया सफाई कामगारास तडकाफडकी कामावरुन काढण्यात आले. यामुळे वैफल्यग्रस्त होऊन संबंधित कर्मचाºयाने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या प्रयत्न केला.
सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयातून मृत स्त्री भ्रुण बाहेर काढणाºया सफाई कामगारास तडकाफडकी कामावरुन काढण्यात आले. यामुळे वैफल्यग्रस्त होऊन संबंधित कर्मचाºयाने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या प्रयत्न केला.
या प्रकारामुळे सिव्हिलमध्ये खबळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित कर्मचाºयाचा जबाब नोंदविला आहे.
विनोद रामजी मकवान (वय ४०, रा. सिव्हिल वसाहत, सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सफाई कर्मचाºयाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर पाचमधील शौचालयात काही दिवसांपूर्वी एक मृत भ्रृण आढळून आले होते. ते भ्रृण बाहेर काढण्यासाठी सफाई कर्मचारी विनोद मकवान याला तेथे नेण्यात आले होते. हॅडग्लोज घालून मकवानने मृत भ्रुण बाहेर काढले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिव्हिलचा कारभार चव्हाट्यावर आला.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल केल्याचा ठपका ठेवून सफाई कामगार विनोद मकवान याला तडकाफडकी कामावरुन कमी करण्यात आले. त्यामुळे तो नैराश्यामध्ये होता.
गुरुवारी सायंकाळी त्याने राहत्या घरात फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने इतर नागरिकांच्या मदतीने मकवानला सिव्हिलमध्ये तत्काळ दाखल केले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी त्याचा जबाब नोंदविला आहे. मकवानने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये जिल्हा शल्चचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्यासह दोन सफाई कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत.
मात्र, त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळे जबाबामध्ये संबंधितांची नावे नोंदविली आहेत का? हे माहित नसल्याचे त्याने लोकमत बोलताना सांगितले.
म्हणे माझा काय गुन्हा..
पाईपमध्ये अडकलेले मृत भ्रुण काढण्यासाठी मला व इतर दोन कर्मचारी यांना बोलावून घेतले. भ्रुण बाहेर काढताना व्हिडिओ दुसºयाने शूट केला. याची मला माहितीही नाही. मी माझे काम करण्यासाठी गेलो. यात माझा काय गुन्हा आहे, असा प्रश्न मकवानने उपस्थित केलाय.