दारूच्या नशेत गळा कापून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:10+5:302021-03-30T04:22:10+5:30

साताराः दारूच्या नशेत स्वतःच्या हातावर व गळ्यावर कापून घेऊन एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना क्षेत्रमाहुली येथे घडली. जखमीवर ...

Attempted suicide by cutting one's throat under the influence of alcohol | दारूच्या नशेत गळा कापून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

दारूच्या नशेत गळा कापून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

साताराः दारूच्या नशेत स्वतःच्या हातावर व गळ्यावर कापून घेऊन एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना क्षेत्रमाहुली येथे घडली. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गजानन हनुमंत कणसे (वय ४२, रा. क्षेत्रमाऊली, ता. सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजानन कणसे यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरामध्ये दारूच्या नशेत हातावर व गळ्यावर स्वतःच्या हाताने कापून घेतले. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी नेमक्‍या कोणत्या कारणातून हा प्रकार केला, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Attempted suicide by cutting one's throat under the influence of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.