सातारा-कागल सहापदरीकरणावर कोल्हापुरातून लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:48 PM2017-08-03T14:48:46+5:302017-08-03T14:52:20+5:30

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

Attention from Kolhapur to Satara-Kagal Supdadirikaran | सातारा-कागल सहापदरीकरणावर कोल्हापुरातून लक्ष

सातारा-कागल सहापदरीकरणावर कोल्हापुरातून लक्ष

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात नवीन कार्यालय सुरू यापूर्वी पुण्यातून कामावर देखरेख ; गतीही येणार सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला गडकरी यांनी मान्यता सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार


सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.


सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगतीही दूर करण्यात आली आहे. आता सर्वांचेच सातारा ते कागल दरम्यानच्या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष असणार आहे.


सातारा ते कागल हे अंतर १३३ किलोमीटर आहे. या मार्गाचे आता सहापदरीकरण होणार आहे. हा मार्ग सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून बेंगलोरकडे जातो. या मार्गावरील सातारा जिल्ह्यात ५७ किलोमीटर अंतराचे सहापदरीकरणाचे काम होणार असून सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार आहे.

आता या कामासाठी कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. सध्या कोल्हापुरात भाड्याने इमारत घेऊन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे कार्यालय पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. या कार्यालयामुळे सातारा-कागल या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर या कामाला गतीही येणार आहे. या कार्यालयामुळे महामार्गाचे काम सुरू असताना येणाºया अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच आवश्यक त्या बाबींची पूर्तताही करणे शक्य होणार आहे.


सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...

सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यास अनेक ठिकाणी जमिनी, उड्डाणपूल, रस्त्यांबाबत अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील नवीन कार्यालयातून त्यावर उपाययोजना करता येणार आहेत. लोकांनाही  कार्यालयात जाऊन आपले म्हणणे मांडता येणार आहे. तसेच कार्यालयातील अधिकाºयांना कामाबाबत सुसंवाद ठेवता येणार आहे.

Web Title: Attention from Kolhapur to Satara-Kagal Supdadirikaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.