Satara: झाडानी जमीन व्यवहार प्रकरणातील नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:34 PM2024-06-21T13:34:25+5:302024-06-21T13:34:44+5:30

जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील ६२० एकर जमीन व्यवहार केला होता.

Attorney letters of notice holders in Jhadani land transaction case cancelled in Satara | Satara: झाडानी जमीन व्यवहार प्रकरणातील नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

Satara: झाडानी जमीन व्यवहार प्रकरणातील नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

सातारा : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी दि. २० रोजी सुनावणी झाली. यावेळी नोटीस बजावलेल्यांनी वकीलपत्र सादर केले होते ते शेतजमीन अधिनियमातील कलमानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. तसेच पुढील सुनावणी दि. ३ जुलै रोजी होणार असून यावेळी नोटीस बजावलेल्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील ६२० एकर जमीन व्यवहार केला होता. कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याची सुनावणी गुरुवार दि.२० जून रोजी झाली. यावेळी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ कमाल जमीन धारणातील ४४ ब नुसार सर्व नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द करण्यात आले असून दि. ३ जुलैला समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी येथील ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्याची मागणी केली होती. याठिकाणी अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे माहिती अधिकार कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्यासह आणखी आठ जणांना नोटीस काढून गुरुवारी दि.२० जून रोजी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या दालनात सुनावणी सुरु झाल्यानंतर याप्रकरणी नोटीस बजावलेल्यांनी वकीलपत्र सादर केले होते ते महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ मधील ४४ ब कलमानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी दि. ३ जुलै २०२४ रोजी होणार असून यावेळी नोटीस बजावलेल्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Attorney letters of notice holders in Jhadani land transaction case cancelled in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.