कवितांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:45 AM2021-09-24T04:45:34+5:302021-09-24T04:45:34+5:30

वडूज : येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा व प्रेरणा शालेय पूर्व ...

The audience is mesmerized by the melodious singing of the poems | कवितांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

कवितांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

Next

वडूज : येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा व प्रेरणा शालेय पूर्व केंद्र या संपूर्ण संकुलाच्यावतीने विद्यार्थी गणेशोत्सव व्याख्यानमाला झाली.

व्याख्यानमालेत बाहेरचे वक्ते निमंत्रित करण्याऐवजी आपल्याच संकुलातील शिक्षकांना वक्ता म्हणून संधी मिळावी, ही संस्थेतील पदाधिकाऱ्यांची सूचना शिक्षकांनी स्वीकारली आणि कल्पनातीत वक्तृत्वाचे दर्शन सर्वांना झाले. या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका शीतल पवार यांनी गुंफले. त्यांचा विषय होता मनमोगरा-कविता मनातल्या..

या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. विविध विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या कविता त्यांनी गोड आवाजात श्रोत्यांना ऐकवल्या. जीवनाला आकार देणाऱ्या, समाजभान जागवणाऱ्या, स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या, निसर्गाचे लोभस रूप दाखवणाऱ्या कविता श्रोत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरल्या. सर्वच कवितांना टाळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांवरील कविता, गड किल्ल्यांवरील कविता विशेष दाद मिळवून गेल्या. विडंबन काव्य प्रकार ऐकताना श्रोत्यांमध्ये हास्यतरंग उठले. काव्य मैफिलीची सांगता करताना वारी, गुरू तुम्हीच आधार या कवितांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

याच व्याख्यानमालेत महादेव भोकरे, विजय राऊत, किरण लोखंडे, किरण कांबळे, संतोष स्वामी यांचीही व्याख्याने झाली. या कार्यक्रमास वडूज शिक्षण विकास मंडळाचे डॉ. हेमंत पेठे, सतीश शेटे, नितीन जाधव, गोविंद भंडारे उपस्थित होते. डॉ. हेमंत पेठे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात शीतल शिंदे यांच्या स्वरचित कवितांचे भरभरून कौतुक केले.

प्राचार्या नयना दौंड, उपमुख्याध्यापक महेश गोडसे, पर्यवेक्षक दिलीप फडतरे व भारती माने, महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कुंभार, सर्व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आशुतोष गवळी यांनी सूत्रसंचालन केले. मिनल देशपांडे यांनी आभार मानले. अनिल माने यांनी मार्गदर्शन केले.

२३वडूज

फोटो : हुतात्मा हायस्कूलमध्ये शीतल पवार यांनी व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफले. (छाया : शेखर जाधव)

Web Title: The audience is mesmerized by the melodious singing of the poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.