औंधच्या आश्रमशाळेचा नावलौकिक चांगला : नितीन उबाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:03+5:302021-06-19T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंध : ‘औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेचा दर्जा व नावलौकिक चांगला असून, अशाच प्रकारे दर्जा राखण्यासाठी सर्वांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : ‘औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेचा दर्जा व नावलौकिक चांगला असून, अशाच प्रकारे दर्जा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा,’ असे आवाहन सातारा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.
औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम देशमुख, मुख्याध्यापक दडस यांचेसह शिक्षक, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन उबाळे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे. शालेय परिसर स्वच्छ ठेवून सभोवताली वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनही करण्याची गरज आहे.’
फोटो १८औंध
औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी भेट दिली. त्या वेळी अध्यक्ष राजाराम देशमुख यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)