औंधच्या मूळपीठ देवीचे मंदिर दर्शनासाठी आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:22+5:302021-01-13T05:43:22+5:30

औंध : प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औंध येथील मूळपीठ निवासिनी आणि ग्रामनिवासिनी श्री ...

Aundh's Moolpeeth Devi temple closed for darshan from today | औंधच्या मूळपीठ देवीचे मंदिर दर्शनासाठी आजपासून बंद

औंधच्या मूळपीठ देवीचे मंदिर दर्शनासाठी आजपासून बंद

Next

औंध : प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औंध येथील मूळपीठ निवासिनी आणि ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवीचे मंदिर १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारीअखेर बंद राहील, अशी माहिती मूळपीठ देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

औंध येथे झालेल्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी, सरपंच सोनाली मिठारी, सपोनि उत्तमराव भापकर, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी, सागर गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

१४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण आहे आणि संक्रांतीला वाण वसा घेण्यासाठी औंधसह जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर महिला भाविक औंधला येतात. तसेच १५ जानेवारीपासून पौषी उत्सवातील धार्मिक विधीला (भोगी ) सुरुवात होते. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थ लाखोच्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात येत असतात. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. याचा प्रादुर्भाव होऊ नये. भाविकांना याचा त्रास होऊ नये याकरिता शासनाने यात्रा उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार वरील काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहील. भाविकांनी आणि ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले आहे.

Web Title: Aundh's Moolpeeth Devi temple closed for darshan from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.