जिल्ह्यात सरासरी २० मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:46+5:302021-07-22T04:24:46+5:30
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी सकाळपर्यंत मिळून सरासरी १९.०८ मिलिमीटर पाऊस झाला तर ...
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी सकाळपर्यंत मिळून सरासरी १९.०८ मिलिमीटर पाऊस झाला तर आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ११९.०८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा तालुका - २३.०३ (९१.०७), जावळी - ४७ (१५४.०८), पाटण - ३५.०० (१५७.०५) मिलिमीटर, कऱ्हाड तालुका - १४.०० (७५.००), कोरेगाव - ९.०७ (८४.०७), खटाव - ७.०८ (४६.००), माण - ३.०६ (११८.०३), फलटण - ०.७ (६५.०४), खंडाळा - २.०७ (४५.००), वाई -१८.०३ (१२०.०४) आणि महाबळेश्वर तालुका - ८५.०६ (६३६.०३) मिलिमीटर असा पाऊस झाला आहे.
दरम्यान, ३६ तासांत महाबळेश्वरनंतर जावळी, पाटण आणि सातारा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.