जिल्ह्यात सरासरी १७ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:58+5:302021-07-27T04:40:58+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवकही मंदावली आहे. रविवारी दिवसभर ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवकही मंदावली आहे. रविवारी दिवसभर आणि सोमवारी सकाळपर्यंतच्या १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६.०८ तर आतापर्यंत एकूण ३९३.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा तालुका - २४.०५ (३९६.०१) मिलिमीटर, जावळी - ३८.०४ (५८४.०१), पाटण - ३३ (७४६.०१), कऱ्हाड तालुका - १२.०४ (३४५.०८), कोरेगाव - ११.०५ (२३२.०१), खटाव - ६.०५ (१३१.०३), माण तालुका - १.०८ (१३८.०८), फलटण - १.०६ (८७.०३), खंडाळा - ५.०६ (१४७.०१), वाई - १४.०८ (४५१.०२) आणि महाबळेश्वर तालुका - ५०.०५ (१५५३.०५) मिलिमीटर असा पाऊस झाला आहे. दरम्यान, महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि सातारा तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे.
............................................................