जिल्ह्यात सरासरी ७६ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:02+5:302021-07-23T04:24:02+5:30
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर आणि गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७६.०२ मिलिमीटर ...
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर आणि गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७६.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर आतापर्यंत सरासरी १९६.०६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे.
जिल्ह्यात गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंतच्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा - १००.०६ (१९२.०६) मिलिमीटर, जावळी - १४०.०२ (२९५), पाटण - १३२.०९ (२९०.०४), कऱ्हाड तालुका - ८१.०४ (१५६.०६), कोरेगाव - ५०.०२ (१३४.०९), खटाव - ३७.०३ (८३.०३), माण तालुका - ८.०१ (१२६.०४), फलटण - ४.०७ (७०.०१), खंडाळा - २३.०७ (६८.०७), वाई - ११२.०४ (२३२.०८) आणि महाबळेश्वर तालुका १९८.०३ (८४८.०४) मिलिमीटर.
दरम्यान, २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यांत झाला आहे. माण व फलटण तालुक्यांत तुरळक पर्जन्यमान झाले आहे.