कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:35+5:302021-04-16T04:40:35+5:30

कोरेगाव : ‘कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू असून, प्रशासकीय आणि ...

Avoid crowds to stop Corona: Shambhuraj Desai | कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

Next

कोरेगाव : ‘कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम

असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू असून, प्रशासकीय

आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना

कराव्यात,’ अशी स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री देसाई

यांनी गुरुवारी सकाळी कोरेगाव येथे भेट देऊन पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख

उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना तोंडी सूचना द्या. शुक्रवारपासून मात्र कठोर कारवाईला सुरुवात करा. कोरोना रोखणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.’’

त्यामुळे सर्वच विभागांनी आपले कर्तव्य योग्य बजावावे. तालुक्यात

लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. तो वाढविला पाहिजे. ३५ टक्के म्हणजे काहीच नाही. त्याबाबत सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना द्या. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के झाल्याबद्दल कौतुक आहे.

यावेळी मनोहर बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, राहूल बर्गे, अमोल मेरुकर,

मुकुंद बर्गे, कुमार शिंदे, प्रशांत बर्गे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ,

तलाठी शंकर काटकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

फोटो आहे...

Web Title: Avoid crowds to stop Corona: Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.