बँकेला ठोकले टाळे; सहाजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:47+5:302021-03-18T04:39:47+5:30
इम्रान लियाकत मुल्ला (रा. रुक्मिणी गार्डन, वाखाण रोड, कऱ्हाड), तोफिक बागवान यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात ...
इम्रान लियाकत मुल्ला (रा. रुक्मिणी गार्डन, वाखाण रोड, कऱ्हाड), तोफिक बागवान यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रच्या बुधवार पेठ शाखेतील मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर हरिश्चंद्र धडाडे (रा. वाखाण रोड, मंगळवार पेठ, कऱ्हाड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिक्षित बेरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, या मागणीसाठी इम्रान मुल्ला याच्यासह अन्य काहीजणांनी बुधवारी आंदोलन केले. आंदोलनकर्ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या बुधवार पेठ शाखेत आले. त्यांनी बँकेचे मुख्य शटर खाली ओढून अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बँकेत आलेल्या नागरिकांनाही कोंडून ठेवले. सुमारे वीस मिनिटे त्यांनी सर्वांना कोंडले. सुशिक्षित बेरोजगारांची कर्जे मंजूर केली नाहीत, तर याप्रमाणेच टाळे ठोकून पुन्हा सर्वांना कोंडून ठेवणार असल्याची धमकी देऊन सर्वजण तेथून पळून गेले. याबाबत मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर धडाडे यांच्या फिर्यादीवरून सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.