बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:57+5:302021-07-10T04:26:57+5:30

सातारा : बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे ...

Avoid Shiv Sena MLA for releasing Bandatatya! | बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!

बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!

Next

सातारा : बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडातात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी या वेळी केली.

वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघातर्फे बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्ध तेथून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात करत आमदार शिंदे आणि इतर वारकऱ्यांनी टाळ वाजवून बंडातात्यांच्या स्थानबद्धतेचा निषेध केला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने बंडातात्या कऱ्हाडकर यांना स्थानबद्ध केले आहे, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण असून बंडातात्यांना मोजक्‍या वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.

या आंदोलनाबाबतची भूमिका व्यक्त करताना आमदार महेश शिंदे म्हणाले, इतर राजकीय कार्यक्रमांसाठी दीड दोन हजार लोक एकत्र आले. मात्र वारीला परवानगी दिली जात असल्याने महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये वेगळी भावना आहे. वारकरी कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी काढणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आध्यात्मिक शक्तींना रोखणे चुकीचे होईल. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि वारकरी यांचा जुना ऋणानुबंध आहे. ते निश्चितपणाने मोजक्या लोकांच्या वारीला परवानगी देतील, अशी खात्री आहे.

दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या कोंडीतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, हे संतुलन पूर्ववत करण्यासाठी आध्यात्मिक शक्तीच कामी येणार आहे. या शक्तीला रोखून धरणे चुकीचे ठरेल. डाऊ आंदोलन अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा वारकरी यांनी केलेले आंदोलन सगळ्यांनाच माहीत आहे त्या पद्धतीचे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर निश्चितपणे येणार नाही, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

फोटो ०९सातारा-महेश शिंदे

: सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेऊन भजन गात बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्ध येथून सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली.

Web Title: Avoid Shiv Sena MLA for releasing Bandatatya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.