सातारकराकडून रशियात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:45+5:302021-09-16T04:48:45+5:30

सातारा : रशियातील पहिल्या पावसाच्या सरींसोबत गणरायाचं आगमन, आरती, मिरवणूक, अस्सल मराठमोळे शिवकालीन पारंपरिक पोशाख असा दिमाखदार महाराष्ट्रीयन संस्कृतीचा ...

Awakening of Maharashtrian culture in Russia from Satarkar | सातारकराकडून रशियात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर

सातारकराकडून रशियात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर

Next

सातारा : रशियातील पहिल्या पावसाच्या सरींसोबत गणरायाचं आगमन, आरती, मिरवणूक, अस्सल मराठमोळे शिवकालीन पारंपरिक पोशाख असा दिमाखदार महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर सोहळा नुकताच मॉस्को शहरात पार पडला. रशियन संस्कृती आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अनोखा मिलाफ यावेळी पाहायला मिळाला. ‘रॉयल तष्ट’च्या वतीने या संस्कृतीची आदान-प्रदान करणाऱ्या अनोख्या सोहळ्याचे सादरीकरण करण्यात आले. एका सातारकराने महाराष्ट्रीय संस्कृतीचा जागर रशियात जाऊन केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘रॉयल तष्ट’च्या वतीने आपली संस्कृती, कला याचे सादरीकरण रशियाची राजधानी मॉस्को शहरात करण्यात आले. यावेळी २२ जणांच्या टीमसोबत ‘रॉयल तष्ट’चे संचालक दीपक माने, क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार, शो कॉर्डिनेटर अभिनंदन देशमुख आदी सहभागी झाले होते. तसेच या २२ जणांमध्ये सातारमधून एकमेव नितेश भोसले यांची निवड करण्यात आली.

या दौऱ्यातील अनुभवाबद्दल बोलताना ‘रॉयल तष्ट’चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार म्हणाले, या दौऱ्यातील अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आपली संस्कृती त्यांना समजावून सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटला. रशियातील लोकांना मराठी किंवा इंग्रजी कळत नाही. पण, त्यांना आपल्या ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृतीबद्दल खूप आकर्षण आहे. पहिल्या दिवशी आम्ही गणेशोत्सवावरील नृत्य सादरीकरण केले. त्यात अनेक रशियन नागरिक स्वतःहून सहभागी झाले. मराठी गाणी त्यांना खूप आवडली. गणपती आरतीची जणू त्यांना भुरळच पडली. त्यांनी या आरतीचा अर्थ आमच्याकडून भाषांतरित करून घेतला आणि म्हणण्याचा देखील प्रयत्न केला.

शिवजातस्य ही कलाकृती

अल्बट स्ट्रीट येथे गणेशोत्सव सादर केला. यामध्ये आरती, मिरवणूक आम्ही सादर केली. तर, दुसऱ्या दिवशी मॉस्को शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘शिवजातस्य’ हे शिवाजी महाराजांवर आधारित कलाकृती व इतर काही नवीन कलेक्शन सादर केले. आगामी काळात ‘एक्झिटो’ या मीडिया कंपनीने दुबईत कला सादर करण्याचे निमंत्रण दिल्याचेही पवार यांनी सांगितले.

फोटो नेम : १४सागर

फाेटो ओळ : रशिया येथे मराठमोळ्या पोशाखामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर करण्यात आला.

Web Title: Awakening of Maharashtrian culture in Russia from Satarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.